नागपूर,: नागपूर महानगरपालिका (NMC) कडून २५ जुलै २०२५ (शुक्रवार) रोजी GH-कान्हान 900 मिमी व्यासाच्या फीडर मुख्य जलवाहिनीवर सकाळी १०:०० ते सायं. ०६:०० या वेळेत ८ तासांचे नियोजित शटडाऊन घेतले जाणार आहे. या दरम्यान जुना फीडर व नवीन अमृत फीडर यामधील 900 × 900 मिमी इंटरकनेक्शनचे (I/C) काम करण्यात येईल.
पाणीपुरवठा बाधित होणारी क्षेत्रे:
बेजनबाग कमांड क्षेत्र (CA): जुना जरीपटका, CMPDI रोड, दयाळू नगर, बँक कॉलनी, वरफकड भाग, बेजनबाग, भांडार मोहल्ला, गोंड मोहल्ला, नाजूल ले-आऊट, लुंबिनी नगर, मेकोसाबाग
नागरिकांनी वरील क्षेत्रांमध्ये अग्रिम पाणीसाठा करून सहकार्य करावे, असे आवाहन NMC कडून करण्यात येत आहे. शटडाऊनचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येईल.
पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.