Published On : Wed, May 16th, 2018

चितळ शिकार प्रकरणी आठ आरोपींना अटक

Chital Meat

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातल्या चितेगाव येथे उघडकीस आलेल्या चितळ शिकार प्रकरणी अटक झालेल्या आरोपींची संख्या आता आठ वर गेली
आहे.

आठही आरोपींनी संगनमत करून सावली वनपरिक्षेत्रातील राजोली क्षेत्रातल्या चितेगाव येथील तलावात तारेचा फास लावून चितळाची शिकार केली होती. आरोपींनी मांस विक्रीसाठी चितळाचे हिस्से केले होते. त्यानंतर मांस विक्री करताना वनविभागाने आरोपींना रंगेहात अटक केली होती.

याप्रकरणी वनविभागाने आणखी कसून चौकशी केली असता ३ आरोपींची संख्या वाढून ८ वर पोहोचली. त्यामुळे या आठही आरोपींना वनविभागाने अटक केली आहे.