Published On : Thu, Oct 14th, 2021
By Nagpur Today Nagpur News

‘मिशन कवच कुंडल’ अंतर्गत पाच दिवसात ७८ हजारावर लसीकरण

Advertisement

मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

नागपूर : कोव्हिडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आणि त्याअनुषंगाने नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरात राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेंतर्गत ८ ते १२ ऑक्टोबर दरम्यान शहरात पहिला व दुसरा असे एकूण ७८,२४० लसीकरणाचे डोज देण्यात आले.

Gold Rate
06 June 2025
Gold 24 KT 98,000/-
Gold 22 KT 91,100/-
Silver/Kg 1,06,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान शहरात लसीकरणासाठी ‘मिशन कवच कुंडल’ ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत मनपाची आरोग्य चमू सज्ज आहे. प्रभागनिहाय लसीकरणाबाबत मनपाची चमू कार्य करीत असून याकरिता आरोग्यसेविका, अधिपरिचारिका, डॉक्टर्स, इंटर्नस यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सुद्धा सहकार्य करीत आहेत.

‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेद्वारे ८ ते १२ ऑक्टोबर दरम्यान ३७०४७ नागरिकांनी पहिला तर ४११९३ नागरिकांनी दुसरा असे एकूण ७८,२४० जणांना लसीकरणाचे दोन्ही डोज देण्यात आले. विशेष म्हणजे यादरम्यान दुसरा डोज घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी दिली.

कोरोनाच्या संसर्गापासून बचावाचे लसीकरण हेच मोठे शस्त्र आहे. १४ ऑक्टोबरपर्यंत शहरात ‘मिशन कवच कुंडल’ मोहिम राबविली जात आहे. याअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घेउन मनपाच्या १५५ लसीकरण केंद्रांपैकी आपल्या जवळच्या केंद्रात जाऊन आपले लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement