Published On : Thu, Oct 14th, 2021
By Nagpur Today Nagpur News

मनपा व भाजप लोकप्रतिनिधींना बसला धस्का

राष्ट्रवादीकॉंग्रेस पक्षाचं सकाळी आंदोलन आणि सायंकाळी बनला रस्ता….

नागपुर – भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या निष्काळजी पनाच्या धोरणामुळे उदय लॉन चौक ते वाठोडा चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे. रोज कोणते ना कोणते अपघात त्याठिकाणी होत असतात. उद्या ही वेळ आपल्यावर व आपल्या परिवारावर पण येऊ शकते, म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष दुनेश्वरजी पेठे, रा.काँ.पा नेते शेखर सावरबांधे व पूर्व नागपूर निरीक्षक चिंटूजी महाराज (रविनिश पांडे) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा तर्फे रूपेश बांगडे यांच्या नेत्रुत्वात भाजपच्या नाकर्तेपणाचा जाहीर निषेध झोपलेल्या नगरसेवकांना जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. व खड्ड्यात भाजप पक्षाचे पिंडदान करण्यात आले.

Gold Rate
22 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,11,200 /-
Gold 22 KT ₹ 1,03,400 /-
Silver/Kg ₹ 1,33,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या आंदोलनात शहर महासचिव नत्थूजी दारोटे, शहर महासचिव प्रशांतजी अग्रवाल, अनिकेत खोण्डेकर, राजेश भाऊ मेण्ढे, राजेश राजागिरे, प्रभाग अध्यक्ष 26 शंकर बनारसे, मनोहरजी निखार, महेश बांगडे, कमलेश वराडे, शुभम भोयर, हर्ष भुरे, गोलू महेशकर, हर्षल खडतकर, महेंद्र गुप्ता, देवाभाऊ, संतोष यादव, रमेश शेंडे, सागर येनुरकर व समस्त पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनाची प्रशासनाने त्वरित दखल घेत सायंकाळ पर्यंत खड्डे बुजवायला सुरुवात केली. त्याबद्दल प्रशसनाचे व स्थानिक लोकप्रतिनिधींचे रूपेश बांगडे यांनी आभार मानले.

Advertisement
Advertisement