Published On : Sat, Oct 24th, 2020

भंडारा जिल्ह्यात आज 72 रुग्णांना डिस्चार्ज

Advertisement

भंडारा : जिल्ह्यात आज 72 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 6664 झाली असून आज 90 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7877 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.60 टक्के आहे.

आज 777 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 90 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 63 हजार 611 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 7877 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. जिल्हयाचा रिकव्हरी रेट 84.65 टक्के असून डबलिंग रेट 53.80 दिवस आहे.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 29, मोहाडी 02, तुमसर 09, पवनी 06, लाखनी 09, साकोली 25 व लाखांदुर तालुक्यातील 10 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 6664 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 7877 झाली असून 1014 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनामुळे 01 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 199 झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.60 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.52 टक्के एवढा आहे.

नागरीकांना आवाहन
· कोवीडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे, मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.

· साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी 20 सेकंद व्यवस्थित धुवा.

साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा.

Advertisement
Advertisement