Published On : Sat, Oct 24th, 2020

दुकान फोडून चोरी, आरोपीला कोठडी

Advertisement

सावनेर – सावनेर/ वाकोडी दि.२७/०७/२०२० रोजी रात्रीचे सुमारास पोलिस स्टेशन खापा अंतर्गत मौजा वाकोडी येथील झामाजी केशव दलाल रा.वाकोडी यांचे हार्डवेअर तसेच जनरल साहित्याचे दुकान ५,३५,०००/- रुपयांची चोरी झाली होती तसेच आठवड्याच्या अंतराने पुन्हा त्याच्या दुकानात तशाच प्रकार चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने सदर दोन्ही घटने संबंधात पोलीस स्टेशन येथे दोन वेगवेगळ्या घरफोडीच्या गुन्हयाची नोंद करण्यात आलेली होती.

त्यानुसार सदर चोरीतील रक्कम पाहता घटनेची गंभीर पाहुन स्थानिक पोलीसां सोबतच मा.पोलीस अधीक्षक सां. यानी स्थानिक गुन्हे शाखा यांना समांतर तपास करण्याचे आदेश दिल्याने सदरचा गुन्हयात ममागील तीन महिन्यांपासून अथक परिश्रम घेवुन नमेण्यात आलेले स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक समांतर तपास करीत होते. त्यातच दिनांक २२/१०/२०२० रोजी मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने संशयित इसम नामे महेश बाबूलाल पराते, वय २८ वर्षे, राहणार झिगरगट्टा तहसील घुघरी,जिल्हा मंडला, मध्यप्रदेश यांचा शोध घेत मध्यप्रदेश येथील त्यांचे राहते घरी पोहोचुन त्याची कसून विचारपूस केली असता त्याने त्याच्या अल्पवयीन तीन साथीदार सर्व रा. झिगरगट्टा, तहसील घुघरी,जिल्हा मंडला, मध्यप्रदेश यांचे मदतीने सदर दोन्ही गुन्हे केल्याचे सांगितले व चोरीतील रक्कम त्यांनी शेतीकाम विषयी व नवीन ट्रॅक्टर,ट्रॉली कल्टीवेटर व महागडे मोबाइल खरेदी करण्यास खर्च केल्याचे सांगितले आरोपीस (अल्पवयीन वगळता) गुन्हासंबंधात पुढील कारवाहीस्तव पोलिस स्टेशन खापा ताब्यात देण्यात आलेले आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन खापा करीत आहे

सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्री. राहुल माकणीकर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अनिल जिट्टावार सहा.पोलीस निरीक्षक जितेंद्र वैरागडे, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे, सहा. फौजदार बाबा केचे,सहा. फौजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, पोलीस हवालदार विनोद काळे,पोलीस नाईक सुरेश गाते, अरविंद भगत, शैलेष यादव,पोलीस शिपाई अमोल वाघ, रोहन डाखोरे,महेश बिसेन, महिला कॉन्स्टेबल नम्रता बघेल आणि चालक पोलीस हवालदार भाऊराव खंडाते ,पोलीस नायक अमोल कुथे तसेच सायबर सलचे पोलीस शिपाई सतीश राठौड़ तसेच पोलीस स्टेशन खापा येथील पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे,पोउपनि झांबरे,सहा. फौजदार मुकुंदा लोंदे,अशोक चटप, पोलीस शिपाई मंगेश सावरकर यांचे पथकाने संयुक्तरित्या केली .

– दिनेश दमाहे (9370868686)