Published On : Wed, Feb 7th, 2018

नांदेडचे श्री गुरुगोविंदसिंहजी स्टेडिअम आणि अध्यासन संकुल आधुनिकीकरणासह इमारतीसाठी केंद्र सरकारकडून ६७ कोटी – मुख्यमंत्री

CM Fadnavis Fadnavis

मुंबई : श्री गुरुगोविंदसिंहजी यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त राज्य सरकारने नांदेड येथे प्रस्तावित केलेल्या स्टेडिअमचे आधुनिकीकरण आणि अध्यासन संकुलाच्या इमारतीसाठी केंद्र सरकारकडून ६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

श्री गुरूगोविंदसिंहजी यांचे ३५० वे जयंती वर्ष गेल्या वर्षी देशभरात मोठ्या उत्साहात साजरे झाले होते. श्री गुरुगोविंदसिंहजी यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंहजी स्टेडिअमचे आधुनिकीकरण आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात श्री गुरुगोविंदसिंहजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राची इमारत बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

Advertisement

त्याला सकारात्मक प्रतिसाद लाभला असून या विभागाने स्टेडिअमच्या आधुनिकीकरणासाठी ४५ कोटी आणि श्री गुरुगोविंदसिंहजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राच्या इमारत बांधकामासाठी २२ कोटी रुपये असा एकूण ६७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या विभागाचे राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून याबाबत माहिती दिली आहे. या निधीच्या मंजुरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि सांस्कृतिक राज्यमंत्री डॉ. शर्मा यांचे आभार मानले आहेत.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement