Published On : Mon, Jan 21st, 2019

बापदेव कारखान्यातील ६२ कर्मचाऱ्यांचे थकीत अनुदेय रक्कम मिळणार

Advertisement

आमदार बच्चु भाऊ कडु यांच्या प्रर्यंत्न यशस्वी.

कन्हान : – दि श्रीराम सहकारी साखर कारखान्यातील ६२ कर्मचाऱ्यांचे अनुदेय रक्कम थकीत (अडकली) होती. या करिता रामटेक प्रहार संघटनेचे रमेश कारेमोरे, महेंद्र भूरे यांच्या माध्यमातून आमदार बच्चु कडु यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांपासून लढा सुरू होता.

या संदर्भात मंत्रालयात सहकार मंत्री मा.सुभाष देशमुख यांच्या दालनात अनेक बैठका पार पडल्या.अखेर (दि११) डिसेंबर २०१८ रोजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे अध्यक्षेत आमदार बच्चु कडु व संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उपरोक्त कर्मचाऱ्यांना अनुदेय रक्कम देण्याचे मान्य केले व तसा आदेश नविन कारखाना व्यंकटेशरा पाॅवर प्रोजेक्ट लि.बाबदेव प्रशासनाला दिले.

हा आदेश पारित झाल्यावर कर्मचाऱ्यां मध्ये व कुटुंबामध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले असून या निर्णयाबद्दल आमदार बच्चु कडु यांचे कामगारांनी आभार व्यकत केले. आणि परिसरातील गणमान्य पदाधिकारी, अधिकारी यांनी वेळोवेळी सहकार्य केल्या बद्दल त्याचे सुध्दा आभार मानले आहे. आभार कार्यक्रमास प्रेमविलास सातपुते, विजय मालवे, चंद्रशेखर लोटावर, दिलीप इंगळे, पंढरीनाथ सरोदे, श्री मोहन धांडे, विवेक गजभिये, आंनद ढोमणे, राजाराम कोल्हे, वामन देशमुख, श्रीराम बावनकर, गणेश सरोदे तसेच समस्त कर्मचारी वर्ग व नागरिक उपस्थित होते.