Published On : Mon, Jan 21st, 2019

साईबाबा आश्रमशाळा टेकाडी जिल्हा हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम

कन्हान : – नागपुर जिल्हा सी बी एस ई बोर्ड शाळेच्या दोन दिवसीय विविध क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या यात साईबाबा आश्रमशाळा टेकाडी च्या खेडाळुनी प्रथम क्रमांक पटकाविला तर मुलीने फायनल पर्यंत मजल गाठली .

सोमलवार स्कुल (सी.बी.एस.ई) कापसी,भंडारा रोड नागपूर येथे नागपूर जिल्ह्य़ातील सी.बी.एस.ई बोर्ड शाळांची दि.१७ ते १९ जानेवारी २०१९ ला दोन दिवसीय विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये व्हाॅलीबाॅल खेळात साईबाबा आश्रमशाळा टेकाडी येथील १३ वर्ष आतील खेळाडुंनी अंतिम सामन्यात सोमलवार स्कुल ला सरळ २ – ० सेट मध्ये पराजित करून नागपूर जिल्ह्य़ातील (सी.बी.एस.ई) शाळांमधुन व्हाॅलीबाॅल खेळामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला तर मुलींनी फायनल पर्यंत मजल गाठुन उपविजेत्या राहील्या.


शाळेचे पदविधर शिक्षक श्री. प्रफुल्ल बालपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी जिल्हयात प्रथम क्रमांकाचे यश संपादन केल्याने शाळेचे संचालक श्री. किशोरजी वानखेडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तर मुख्याध्यापक श्री. राजेश खोरे व संजय काळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

पुरूषोत्तम पाटील यांनी मौलीक सहकार्य केले असुन आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी खेडाळु विद्यार्थ्यांना पुढील यशाबद्दल शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.