Published On : Fri, Apr 2nd, 2021

आमगाव -गोंदिया व तिरोडा गोंदिया मार्गासाठी ५५७.३७ कोटी मंजूर

खा.प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याला यश

केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे मानले आभार

Gold Rate
13 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,800 /-
Gold 22 KT ₹ 1,02,100 /-
Silver/Kg ₹ 1,29,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गोंदिया :जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ५४३ आमगाव-गोंदिया व राष्ट्रीय महामार्ग ७५३ तिरोडा-गोंदिया या मार्गाचे सिमेंटीकरण व विस्तारी करणाचे काम टप्प्याटप्प्याने गेल्या ४ वर्षांपासून सुरू आहे.

त्यातल्यात्यात आमगाव-गोंदिया व तिरोडा – गोंदिया या दोन्ही महामार्गाच्या बांधकामाला गती यावी, याकरीता त्वरित निधी उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी खा. श्री प्रफुल पटेल यांनी केंद्रीय बांधकाम मंत्री श्री नितीन गडकरी यांच्याशी दिनांक 03 मार्च 2020 व 10 मार्च 2021 ला पत्र व्यवहार करून पाठपुरावा केला. दरम्यान केंद्रीय मंत्रालयाकडून आमगाव-गोंदिया या मार्गाकरीता २३९.२४ कोटी व तिरोडा – गोंदिया या २८.२ किमीच्या मार्गाकरीता २८८.१३ कोटीचा निधी मंजूर केला आहे. यामुळे खा. श्री पटेल यांनी ना. श्री गडकरी यांचे आभार मानले आहे.

५ वर्षांपूर्वी जिल्ह्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंटीकरण व विस्तारीकरणाचे काम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले होते. दरम्यान बालाघाट-गोंदिया – आमगाव- देवरी- कोरची-कुरखेडा या महामार्गाचे ३८.२०० ते ५८.२७५ किमी रस्त्याचे बांधकामाला टप्याटप्प्याने सुरूवात करण्यात आली. गोंदिया ते आमगाव या महामार्गाच्या बांधकामाला गती मिळावी, यासाठी आवश्यक निधी त्वरित देण्यात यावे तसेच तिरोडा ते गोंदिया या २८.२ किमीच्या रस्ता बांधकामासाठी निधी देण्यात यावी, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाशी पाठपुरावा केला.

दरम्यान स्मरणार्थ ना. श्री गडकरी यांच्यासोबत दोनदा पत्र व्यवहार देखील करण्यात आला. खा. श्री पटेल यांच्या पाठपुराव्याची दखल घेत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाकडून राष्ट्रीय महामार्ग क्र.५४३ आमगाव-गोंदिया यासाठी २३९.२४ कोटी व राष्ट्रीय महामार्ग क्र.७५३ तिरोडा-गोंदिया या महामार्गाच्या २८.२ किमीसाठी २८८.१३ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही रस्त्याच्या बांधकामाचे निविदा प्रक्रियेचे कार्यक्रम जाहिर झाले आहे. ६ मे २०२१ पर्यंत दोन्ही रस्ता बांधकामाच्या कंत्राटाचे निविदा पूर्णरूपास येणार आहेत. त्यामुळे लवकरच गोंदिया ते तिरोडा व गोंदिया ते आमगाव या दोन्ही महामार्गाचे सिमेंटीकरण व विस्तारीकरणाचे काम सुरू होणार आहे. गोंदिया जिल्ह्याच्या विकासकामाला चालना देण्याच्या अनुसंगाने केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने सहकार्य केल्याबद्दल खा. श्री प्रफुल पटेल यांनी ना. श्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे.

Advertisement
Advertisement