Published On : Fri, Jun 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

किचनमध्ये फणा काढून बसला ५ फूट लांबीचा नाग; बेलतरोडीत सर्पमित्राच्या धाडसी रेस्क्यूने टळला अनर्थ

Advertisement

नागपूर : बेलतरोडीतील शंकरपूर परिसरात एका कुटुंबासाठी सकाळचा वेळ अचानक भीतीदायक ठरला. घरातील किचनमध्ये तब्बल ५ फूट लांबीचा विषारी नाग शिरल्याने एकच खळबळ उडाली. गृहिणी नाश्ता तयार करत असताना त्यांची नजर फणा काढून बसलेल्या नागावर पडताच संपूर्ण कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सर्पमित्र शुभम पराळे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून धाडसी आणि यशस्वी रेस्क्यू करत नागाला सुरक्षित पकडले.

सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास शारदा संतोष या आपल्या किचनमध्ये काम करत होत्या. यावेळी किचनमधील कपाटाजवळ त्यांना अचानक एक मोठा नाग दिसला. फणा काढून बसलेल्या नागाला पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. घरातील लहान मुले घाबरून ओरडू लागली आणि संपूर्ण कुटुंबाने तातडीने किचनमधून बाहेर धाव घेतली.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटनेची माहिती नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर सर्पमित्र शुभम पराळे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. माहिती मिळताच ते अवघ्या दहा मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले.

तपासणीदरम्यान नाग किचनमधील कपाटाखाली लपून बसल्याचे आढळले. रेस्क्यू सुरू असताना संतप्त झालेल्या नागाने दोन वेळा हल्ला करण्याचा आणि दंश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शुभम पराळे यांनी अत्यंत सावधगिरी आणि कौशल्याने नागाला सुरक्षितपणे पकडण्यात यश मिळवले.

Advertisement

रेस्क्यूनंतर नागाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी बुटीबोरी जंगल परिसरात नेऊन सुरक्षित मुक्त करण्यात आले. नाग सुरक्षितपणे पकडला गेल्यानंतर कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि घरातील वातावरण पुन्हा पूर्ववत झाले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.