Published On : Mon, Jan 27th, 2020

५ फेब्रुवारीपासून सिद्धेश्वर सभागृह ते राजकमल चौक रस्ता वाहतुकीसाठी बंद

टप्पा दोन मधील सीमेंट रस्त्याचे काम : ३१ मार्च पर्यंत बंद राहणार वाहतूक

नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे सुरू असलेल्या सीमेंट क्राँक्रीट रस्ते प्रकल्पाच्या टप्पा दोन अंतर्गत पॅकेज क्र. ७ मधील रस्ता क्र. ३४ सिद्धेश्वर सभागृह ते राजकमल चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम प्रस्तावित असल्याने सदर रस्ता ५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी २४ जानेवारी रोजी काढलेल्या आदेशातून तसे निर्देश दिले आहेत. काम सुरू करण्यापूर्वी कंत्राटदाराने स्वत:चा पत्ता व संपर्कासाठी मोबाईल क्र. असलेला फलक लावावा, पर्यायी मार्ग सुरू होतो त्याठिकाणी दोन्ही टोकावर तसेच बॅरिकेटस्‌जवळ स्वत:चे वाहतूक सुरक्षा रक्षक नेमावे, वाहतूक सुरक्षा रक्षक, चिन्हांच्या पाट्या, कोनस्‌, बॅरिकेटस्‌, रिफलेक्टिव्ह जॅकेटस्‌, एल.ई.डी. बॅटन, ब्लिकर्स आदी संसाधने उपलब्ध करून देण्याचे आदेशही दिले आहेत. कामादरम्यान उजव्या बाजूने दुतर्फा वाहतूक चालणार आहे, त्याठिकाणी अस्थायी रस्ता दुभाजक तयार करून एकाच मार्गावरून दुतर्फा वाहतूक वळविण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे.