Advertisement
नागपूर: राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर येथे 71 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अकादमीच्या प्रधान महासंचालिका अलका त्यागी उपस्थित होत्या. याप्रसंगी त्यागी यांनी अधिकारी प्रशिक्षणार्थींना भारतीय राज्यघटनेत समाविष्ट असलेल्या मूल्यांप्रमाणे आपले कर्तव्य बजावण्याचे व त्यांच्या क्षमतेनुसार समाजातील वंचित घटकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
ध्वजारोहणाच्या सोहळ्यानंतर ‘इंडिया डे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भारतीय राजस्व सेवेतील 73 व्या तुकडीच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. या कार्यक्रमांमध्ये युन्सेकोने सांस्कृतिक वारसा म्हणून त्यांना मान्यता दिलेले कलबेलिया लोकगीत व राजस्थानी नृत्य यांचेही सादरीकरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमास अकादमी मधील तसेच 73 व्या भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी उपस्थित होते.