Published On : Thu, Nov 26th, 2020

धंतोली झोन व ओंकार नगर नवे जलकुंभ यांचे शटडाऊन शुक्रवार २७ नोव्हेंबर रोजी

Advertisement

जारी नगर जुने व नवे जलकुंभ, रेशीमबाग, हनुमान नगर व ओंकार नगर (नवे) जलकुंभ यांचा पाणीपुरवठा शुक्रवारी राहणार बाधित


नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी वंजारी नगर जलकुंभावर फ्लो मीटर बसविण्याच्या कामासाठी २७ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १० ते रात्री १० दरम्यान घेण्यात येईल. दरम्यान मनपा-OCW ने हनुमान नगर झोन अंतर्गत ओंकार नगर जलकुंभ स्वच्छ करण्याचे काम देखील २७ नोव्हेंबर २०२० रोजी हाती घेण्याचे ठरविले आहे.

या कामांमुळे धंतोली झोन, वंजारी नगर जुने व नवे जलकुंभ, हनुमान नगर जलकुंभ व रेशीमबाग जलकुंभ यांना शुक्रवार सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही तर शनिवार २८ नोव्हेंबर रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कामांमुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग–
वंजारी नगर जुने व नावे जलकुंभ: जुना व नवा बाभूळखेडा, कुकडे लेआऊट, वसंत नगर, वंजारी नगर, नवे व जुने कैलाश नगर, चंद्रमणी नगर, जोशीवाडी, श्रमजीवी नगर, प्रगती नगर, रामेश्वरी रोड, विश्वकर्मा नगर, बजरंग नगर, सावित्रीबाई फुले नगर, म्हाडा क्वार्टर, पोलीस क्वार्टर, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सोमवारी क्वार्टर, रघुजी नगर, आयुर्वेदिक लेआऊट, आदिवासी कॉलोनी.

हनुमान नगर जलकुंभ: हनुमान नगर, प्रोफेसर कॉलोनी, चंदन नगर, PTS क्वार्टर, वकीलपेठ, महेश कॉलोनी, सोमवारी क्वार्टर, सिरसपेठ, सराईपेठ, रेशीमबाग.

रेशीमबाग जलकुंभ: ओम नगर, सुदामपुरी, आनंद नगर, नेहरू नगर, महावीर नगर, शिव नगर, जुने नंदनवन, भागात कॉलोनी, गायत्री नगर, गणेश नगर, जुनी शुक्रवारी, लभानतांडा

दरम्यान, मनपा-OCW यांनी हनुमानन नगर झोन अंतर्गत ओंकार नगर (नवे) जलकुंभ देखील शुक्रवार २७ नोव्हेंबर रोजी स्वच्छ करण्याचे ठरविले आहे.

ओंकार नगर (नवे) जलकुंभ स्वच्छतेच्या कामांदरम्यान पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: आकाश नगर, अवधूत नगर, शेष नगर, गीता नगर, एकमत नगर, मंगलदीप नगर १ व २, कल्पतरू नगर, कल्याणेश्वर नगर, मुद्रा नगर, शाहू नगर, अलंकार नगर, नरहरी नगर, चिंतामणी नगर, चंद्रिका नगर १ व २, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, अंबा नगर, गगनदीप सोसायटी, जय गुरुदेव नगर, बाळकृष्ण नगर, ई.

यादरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठाही शक्य होणार नसल्याने मनपा-OCW यांनी नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

For any complaints regarding water supply or need information please do contact @ NMC-OCW’s Toll Free Number 1800 266 9899 at any time.

Advertisement
Advertisement
Advertisement