Published On : Thu, Nov 26th, 2020

विखूरलेल्या समाजाला एकत्रित आणण्यासाठी परिवर्तन पॅनलची निर्मिती – प्रशांत डेकाटे

Advertisement

पदवीधर निवडणूक : पदवीधर विद्यार्थ्यांचे प्रश्न विधानपरिषेदेत मांडणार

नागपूर– विखुरलेल्या सर्व समाजाला एकत्र आणून त्यांच्यात नवचैतन्य व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी व आदर्श शिक्षण प्रणाली प्रस्थापित करण्यासाठी ८ संघटना मिळून सिनेट परिवर्तन पॅनल तयार करण्यात आले आहे. सिनेट परिवर्तन पॅनलची स्थापना ६ जानेवारी २०१८ करण्यात आली. या पॅनलवर विद्यापीठात दोन सिनेट निवडून गेले. आता पदवीधर निवडणूकीत एकत्र येऊन ही निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे परिवर्तन पॅनलचे उमेदवार प्रशांत डेकाटे यांनी सांगितले. एका खासगी वाहिनीशी बोलत होते.

यावेळी त्यांच्यासमवेत सिनेट सदस्य शिलवंत मेश्राम, महेश बनसोड, भूषण वाघमारे, सूरज तागडे, अलोक गजभिये, प्रतिक बनकर प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रशांत डेकाटे म्हणाले, समाजात आंबेडकरी विचार संघटना विखूरलेल्या होत्या. त्या एकत्र करणे गरजेचे होते. त्याअनुषंगाने त्या एकत्र करून आम्ही परिवर्तन पॅनलची निर्मिती केली. आमचा राजकीय पक्ष नाही, आमची नुकतीच सुरूवात आहे. विद्यापीठात निवडून आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना न्याय दिला. आता विधानपरिषेदत निवडणून गेलो तर बरोजगारीचा प्रश्न असो, विदर्भावर होणारा अन्याय असो, नेट-सेट धारांकाचे प्रश्न असो ते विधानपरिषदेत मांडणार आहे. आम्ही कोणत्याही विचारधारेशी आमची संघटना बांधिल नाही. त्यामुळे कोणत्याही समस्या, प्रश्न, त्यांचे हक्क मांडण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. यामतदार संघात आपली मक्तेदारी सांगणाऱ्या भाजपाला या निवडणूकीत धडा शिकवा, असे आवाहन प्रशांत डेकाटे यांनी केले.

निवडणून आल्यानंतर आपला अजेंडा काय, असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी नेट सेट विद्यार्थ्यांची भरतीची मागणी जोर धरणार असून ही भरती केंद्रीय स्तरावर करण्याची मागणीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे प्रशांत डेकाटे यांनी सांगितले.

बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पुणे, मुंबई यासारख्या महानगरात बेरोजगारी प्रश्न आहे. या भागात औद्यीगीकरण मोठ्या प्रमाणावर आहे. नागपुरात नसल्यामुळे येथील विद्यार्थी नोकरीसाठी पुणे मुंबईकडे जातात. नागपुरात औद्योगिकरण आणण्यासाठी माझा प्रयत्न असेल, असेही प्रशांत डेकाटे यांनी सांगितले.