Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, May 21st, 2018

  पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक तालुक्यात ग्रीन बेल्टसाठी 5 कोटी रुपयाचा निधी – चंद्रशेखर बावनकुळे

  • जिल्हा खनिज प्रतिष्ठान विकास निधी आढावा, पर्यावरण व स्वच्छतेला प्राधान्य
  • प्रत्येक शाळेत सॅनिटरी नॅपकीन विल्लेवाट मशीन, निधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुध्द कारवाई, सिंचन पुर्नस्थापनेसाठी तालुक्याला 10 कोटी


  नागपूर: पर्यावरण संवर्धन तसेच स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि नागरिक सुविधांच्या विकासासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठान विकास निधीमधून जिल्हयाला 135 कोटी रुपये प्राप्त झाले असून त्यापैकी 85 कोटी रुपयाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात 10 एकरावर ग्रीन बेल्ट तयार करण्यासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली.

  जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात जिल्हा खनिज प्रतिष्ठान ‍अंतर्गत विकास कामांसाठी उपलब्ध झालेल्या निधी आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. त्यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा खनिज कर्म अधिकारी श्रीराम कडू, प्रतिष्ठानचे सदस्य कौस्तुब चॅटर्जी तसेच सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

  जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्राप्त झालेला निधी सामुहिक व सामाजिक विकास, पायाभूत सुविधा, आरोग्य, पिण्याचे पाणी, जलसंसाधनाचा विकास तसेच पर्यावरण व स्वच्छतेसाठी प्राधान्याने करण्यात येत असून विभाग प्रमुखांनी प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, या अंतर्गत 85 कोटी रुपयाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून त्यानुसार निधी उपलब्ध करुन देण्यात आला. विभाग प्रमुखांनी उपलब्ध निधीचा उपयोग कालबध्द कार्यक्रमानुसार करणे आवश्यक आहे.

  जिल्हयातील कर्करोग रुग्णांच्या तपासणीसाठी आवश्यक यंत्र सामुग्री खरेदीसाठी गरीब रुग्णांना छातीच्या कर्करोगाचे तात्काळ निदान व्हावे यादृष्टीने तात्काळ पुरतता करण्याची सूचना करताना पालकमंत्री पुढे म्हणाले की, गावांमध्ये पर्यावरण आणि स्वच्छतेला प्राधान्य देवून सावनेर व कोराडीच्या धर्तीवर घनकचरा व्यवस्थापन करणे, तसेच उपलब्ध कचऱ्यापासून खत तयार करण्यासाठी बचतगटांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना बचतगटाच्या माध्यमातून स्वस्त सेंद्रीय खते उपलब्ध होणार असल्याचे यावेळी सांगितले.

  जिल्हयातील बंद असलेल्या व सिंचनासाठी पुर्नस्थापना करुन सिंचन सुविधा निमार्ण करण्यासाठी किरकोळ दुरुस्ती शेतचाऱ्या पूर्ण करणे, गेट लावणे आदी कामांसाठी राळेगण सिंधीच्या धर्तीवर खनिज प्रतिष्ठान निधीमधून दोन वर्षाच्या विशेष कार्यक्रम तयार करण्यात येवून 10 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी तालुकानिहाय प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.

  उमरेड व रामटेक या तालुक्यातील भौतिक सुविधांच्या विकासासाठी प्रत्येकी 10 कोटी रुपये डागा रुग्णालय इंदीरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय यांनी साधन सामुग्री व आवश्यक सुविधांसाठी निधी तसेच जिल्हयातील सर्व नळ पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्यासाठी निधीची उपलब्धता समाज कल्याण विभागातर्फे 1125 लाभार्थ्यांना ट्रायसिकलचे वाटप, कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत आर्थिक प्रगतीसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे विशेष उपक्रम राबविणे, पर्यावरण संवर्धनाअंतर्गत जागृती निमार्ण करणे तालुकानिहाय विशेष निधी यावेळी मंजूर करण्यात आला.

  प्रारंभी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्राप्त झालेला निधी व विभागांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाची माहिती बैठकी देण्यात आली. आभार प्रदर्शन जिल्हा खनिज कर्म अधिकारी श्रीराम कडू यांनी दिली.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145