Published On : Thu, Apr 22nd, 2021

405 लाभार्थी घेत आहेत दररोज निशुल्क शिवभोजनाचा लाभ

– शहरात सुरू आहेत एकूण तीन शिवभोजनथाळी केंद्र

कामठी :-राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान कुणीही गरजू उपाशी राहू नये या ऊद्देशातून नागरीकांना एक महिना मोफत शीवभोजन थाळी देण्याचा निर्णय घेतला आहे.या अंतर्गत कामठी शहरातील 3 शिवभोजन केंद्रातून 15 एप्रिल पासून दररोज 405 लाभार्थ्यांना मोफत शिवभोजनथाळी देण्यात येत असून प्रत्येक धिवभोजन थाळी मधून 135 लाभार्थ्यांना मोफत शिवभोजन थाळी देण्याचे फर्मान सोडले असून यानुसार दररोज 405 लाभार्थ्यांना मोफत शिवथाळी भोजन देण्यात येत आहे.

शिवभोजन थाळीची सुरुवात 1 जानेवारी 2020 पासून सुरू करण्यात आली आहे त्यावेळी नागरिकांना प्रति थाळी 10 रुपय द्यावे लागत होते यामध्ये वरण, भात, भाजी व चपाती दिल्या जात होते मार्च 2020 मध्ये आलेल्या कोरोना महामारीच्या काळात हे मूल्य 10 रुपयावरून 5 रुपये करण्यात आले.परंतु सध्या कोरोनाची दुसरो लाट सुरू आहे यामध्ये एक महिना शिवथाळी मोफत देण्याचे शासनाने आदेशीत केले आहे.जे मजूर दिवसभर काम करून आपला उदरनिर्वाह करतात अशा नागरिकांचा विचार करून या महामारीच्या काळात कोणीही उपाशी राहू नये .आजच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 15 दिवस घरी राहून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी सक्षम नाही यावेळी रिक्षाचालक तसेच मजूर दिवसभर काम केल्याशिवाय त्यांच्या घरी चूल पेटत नाही अशा नागरिकासमोर बिकट परिस्थितो निर्माण झाली आहे.तर या शीवभोजन थाळीवर केंद्र चालकांना ग्रामीण भागात 25 रुपये तर शहरी भागात 40 रुपयाचे अनुदान दिले जात आहे.


कामठी शहरात तीन शिवथाळी केंद्र सुरू असून कामठी बस स्थानक च्या बाजूला सुरू असलेले जिजाऊ शिवथाळी केंद्रातून 15 एप्रिल पासून लाभार्थ्यांना पुढील एक महिन्यापर्यंत मोफत शिवथाळी भोजन देण्यात येत असून या बस स्थानकाजवळून रिक्षाचालक, बेघर, गरीब नागरीकांचा राबता असतो या लाभार्थ्य सह बाजूला असलेल्या सराय झोपडपट्टी मधील नागरिकांची मोफत भूक शमविण्याचे काम या जिजाऊ शिवथाळी भोजन केंद्रातून होत आहे.