Published On : Thu, Apr 22nd, 2021

वाढीव ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा

Advertisement

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न
·मनुष्यबळ वाढविण्यास प्राधान्य
·लसीकरणात जिल्हा अग्रस्थानी
·परिस्थितीवर जिल्हाधिकारी लक्ष ठेऊन

भंडारा:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने अधिकाधिक सुविधा उभारण्यावर भर दिला असून जिल्ह्याला अधिकचा प्राणवायू तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन तातडीने मिळण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असून तो लवकरच उपलब्ध होणार आहे.

वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता आरोग्य विभागातील मनुष्यबळ वाढविण्यात आले असले तरी प्रशिक्षित मनुष्यबळाची निकड दिवसेंदिवस भासत आहे. कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर येथे प्रत्यक्ष भेट देऊन जिल्हाधिकारी व्यवस्थेचा आढावा घेत आहे. या केंद्रात प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार व भोजनाची व्यवस्था उत्तम असावी, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

रुग्णालय व खाटांची माहिती
भंडारा जिल्ह्यात कोविड रुग्णांची वाढ सतत होत आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता भंडारा जिल्हयात एकूण 6 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (1 शासकीय, 5 प्रायव्हेट), 26 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर (6 शासकीय व 20 प्रायव्हेट) व 5 कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. यामधे आयसीयु बेड 219 (शासकीय 50 व प्रायव्हेट 169), ऑक्सीजन सर्पोटेड बेड 620 (शासकीय 255 व प्रायव्हेट 365) व व्हेन्टीलेटर बेड 130 (65 शासकीय व 65 प्रायव्हेट) आहेत.

कोरोना आकडे
21 एप्रिल 2021 पर्यंत भंडारा जिल्ह्यात 40512 रुग्ण कोरोना बाधीत आहे. तसेच 27797 रुग्ण बरे झालेले आहे. 628 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झालेला आहे. भंडारा जिल्ह्यात मृत्युदर 1.55 टक्के आहे तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.61 टक्के आहे.

मनुष्यबळ
भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सतत वाढ होत असल्यामुळे वाढत्या कोरोना बाधीत रुग्णांची सेवा करण्याकरीता मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे शासनाचे निर्देशानुसार कंत्राटी तत्वावर वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. 16 पदे, वैद्यकीय अधिकारी आयुष यांची 11 पदे, स्टॉफ नर्सचे 80 पदे तसेच आरोग्य सेविकांची 142 पदे भरण्यात आलेली आहे.


लसीकरण
भंडारा जिल्ह्यात 16 जानेवारी 2021 पासुन कोविड लसीकरणास सुरुवात झालेली असून आजपर्यत 16158 लोकांना प्रथम डोज व 26140 लोकांना दुसरा डोज देण्यात आलेला आहे. त्यापैकी प्रथमत: कोविड आजाराशी लढा देणाऱ्या 10148 हेल्थ केअर वर्कर (HCW) यांना प्रथम डोज देण्यात आलेला असुन दुसरा डोज 6484 हेल्थ केअर वर्कसना देण्यात आलेला आहे. तसेच 8974 फ्रन्ट लाईन बकर (FLW) यांना प्रथम डोज देण्यात आलेला असुन 4672 फ्रन्ट लाईन वर्कर ना दुसरा डोज देण्यात आलेला आहे. 45 वय वर्षावरील 142459 लोकांना प्रथम डोज देण्यात आलेला असुन 14984 लोकांना दुसरा डोज देण्यात आलेला आहे.

लस उपलब्धता
भंडारा जिल्ह्यात आजपर्यत कोव्हीसील्ड लस 1,10,400 डोज प्राप्त झालेली असुन त्यापैकी 87674 प्रथम डोज व 13012 दुसरा डोज असे एकूण 100686 डोज चा वापर करण्यात आलेला आहे व 19810 डोज शिल्लक आहेत. तसेच 1,24,900 डोज कोव्हॅक्सीन लसीचा पुरवठा झालेला असून त्यापैकी प्रथम डोज करीता 73907 डोजचा वापर करण्यात आलेला आहे व 13128 दुसऱ्या डोज करीता वापर करण्यात आलला आहे व 40140 डोज त्यापैकी शिल्लक आहेत.

कोविड हेल्पलाईन सुरू
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना माहिती पुरविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे. 07184-251222 हा नंबर डायल करून कोविड उपचारासंबंधित माहिती मिळविता येणार आहे. या नंबरवर कोरोनाचा उपचार कुठल्या रुग्णालयात होतो, खाटांची उपलब्धता, चाचण्या बाबत माहिती नागरिकांना मिळणार आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.