Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jul 16th, 2020

  ४ बिबट प्रजातीच्या पिल्यांचे गोरेवाडा वन्य प्राणी बचाव केंद्रात आगमन

  नागपूर: प्राप्त माहितीच्या आधारे अकोलावनविभाग अंतर्गतपातुर वनपरिक्षेत्र मधील पास्टूल येथील मोर्णा नदी पात्रामध्ये बिबट प्रजातीचे ३ पिल्ले दि. ३०.०६.२०२० रोजी आढळून आलीतव दि. ०१.०७.२०२० रोजी पुन्हा त्याच भागात १ बिबट प्रजातीचे पिल्लू आढळून आले, असे एकूण ४ बिबट प्रजातीचे पिल्ले आढळून आली होती.सदर ठिकाणी त्या ४ बिबट प्रजातीच्या पिल्यांची माता बिबट (मादी) दि. १५.०७.२०२० रोजी पर्यंत प्रयत्न करूनही आढळून आली नसल्याने त्यांचे पुढील संगोपनाकरिता सदर पिल्यांना वन्यप्राणी बचाव केंद्र, गोरेवाडा प्रकल्प, नागपूर येथे हलविणे आवश्यक होते.त्या अनुषंगाने मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), म.रा., नागपूर आदेशान्वये सदर ४ बिबट प्रजातीच्या पिल्यांची रवानगी गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्र, नागपूर येथे करण्यात आली आहे.

  त्यानुसार श्री. एन.सी. गोंडाणे, सहाय्यक वनसंरक्षक (MAP),अकोला वनविभाग, अकोला व श्री. धीरज मदने, वनपरिक्षेत्र अधिकारी, पातुरयांचेद्वारे शासकीय वाहनाने सदर ४ बिबट प्रजातीचे पिल्लेगोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रातदि. १६.०७.२०२० रोजी दुपारी०१:३० वाजता दाखल करण्यात आले.

  डॉ. मयूर पावशे, डॉ. सुजित कोलंगथ व डॉ. शालीनि ए. एस. यांनी सदर ४ बिबट प्रजातीच्या पिल्यांचीतपासणी केली असता असे निदर्शनास आले कि सदर ४ बिबट प्रजातीच्या पिल्यांची शारीरिक स्थिती समाधानकारक असून कुठल्याही बाह्य जखमा आढळून आल्या नाहीत. सदर४ बिबट प्रजातीच्या पिल्यांची पुढील संगोपन / देखभाल वन्यप्राणी बचाव केंद्र, गोरेवाडा प्रकल्प, नागपूर येथे घेण्यात येत आहे.

  याप्रसंगी श्री. नंदकिशोर काळे, विभागीय व्यवस्थापक, गोरेवाडा प्रकल्प,नागपूर,श्री. एच. व्ही. माडभुषी, सहाय्यक वनसंरक्षक, गोरेवाडा प्रकल्प, नागपूर, श्री. आर. पी. भिवगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यप्राणी बचाव केंद्र, गोरेवाडा प्रकल्प, नागपूर, तसेचश्री. आर. डी. वलथरे, वनपाल,श्री. हरीश किनकर, वनरक्षकव श्री. आर. एच. वाघाडे, वनरक्षक (सर्व) वन्यप्राणी बचाव केंद्र, गोरेवाडा प्रकल्प, नागपूरहे उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145