Published On : Thu, Oct 12th, 2017

अमरावती महामार्गावर धामना शिवारात ट्रक-कार अपघातात 4 गंभीर


वाडी(अंबाझरी): नागपूर – अमरावती महामार्गावर बुधवार दि. 11.10.17 ला दुपारी झालेल्या कार ट्रक अपघातात कार मध्ये बसलेले 4 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.

प्राप्त माहिती नुसार कार क्र MH. 40 – AC/2202 स्विफ्ट डिझायर वेगाने अमरावती च्या दिशेने जात असताना धामना येथील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर अमरावती कडून नागपूर च्या दिशेने येणारा ट्रक क्र. MH. 35 – 693 यांच्या चालकाने पेट्रोल भरण्याच्या उद्देशाने पेट्रोल पंप कडे दुभाजकाच्या रिक्त जागेमधुन ट्रक वळविला याच क्षणी अमरावती च्या दिशेने जाणारी हि कार धडकली या अपघातात कारचा समोरिल भाग पुर्ण चेंदा मेंदा झाला. व त्यातील चारही प्रवासी गंभीर जखमी झाले.

दुर्घटनेचा जोराचा आवाज येताच पेट्रोल पंप वरील कर्मचारी व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी दुर्घटनाग्रस्त जखमी झालेल्या चारही जनांना बाहेर काढले यामध्ये कारच्या समोर बसलेले लालजीभाई पटेल वय ७२ व कारचालक पुरुषोत्तम पटेल वय ४५ हे अधिक जखमी झाल्याचे दिसून आले तर मागे बसलेले चेतना पटेल वय ४० व भावना पटेल वय ३२ ह्मा देखील जखमी झाल्या . महामार्ग साह्यता पोलीस व हिंगणा पेठ चौकीचे पोलीस हे घटनास्थळी पोहचले या चारही जखमींना पोलीस वाहणातून तातडीने वाडी येथील एका खाजगी रुग्नालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असता त्यांची गंभीर स्थिती पाहून त्यांना थेट उपचारासाठी आई सी यू त दाखल केले त्यामुळे दुर्घटनेबाबद अधिक माहीती प्राप्त करता आली नाही.

प्रत्यक्षदर्शीच्या चचेर्नुसार नुसार महामार्गाच्या दुभाजकावर लावलेले झाडेवाढल्याने दुभाजकाच्या रिक्त जागेतून वाहण वळतांनी दिसत नाही. त्यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा आहे. हिंगणा पो स्टे चे मोरेश्वर बारापात्रे यांनी दुर्घटनेचा पंचनामा करून ट्रकचालकाला ताब्यात घेतले .व पुढील तपास हिंगणा पोलीस करित आहेत.