Published On : Mon, Jun 29th, 2026
By Nagpur Today Nagpur News

एमआयडीसी परिसरात ३६ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल

Advertisement

नागपूर -नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा रोडवरील झोन चौक परिसरात ३६ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात हल्लेखोराने लाकडी दांडा आणि विटेने डोक्यावर सपासप वार करून युवकाची हत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मृत युवकाची ओळख जितेंद्र उर्फ पप्पू बोरेलाल तांडेकर (वय ३६, रा. अमरनगर) अशी झाली आहे. तो हमाली तसेच वाहनचालक म्हणून काम करत होता. शनिवारी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास जितेंद्र घराबाहेर पडला होता. मात्र रात्री उशिरा झोन चौक येथील ठाकरेजी टी शॉपच्या काउंटरमागे अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर लाकडी दांडा आणि विटेने डोक्यावर व कपाळावर वार केले. या भीषण हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

Gold Rate
Sept 29,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 47,300 /-
Gold 22 KT ₹ 1,36,5700 /-
Silver/Kg ₹ 2,22,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रविवारी सकाळी स्थानिक नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्स रुग्णालयात पाठवला.

मृताचा मोठा भाऊ दिनेश तांडेकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

Advertisement

दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस सर्व शक्य त्या अंगांनी तपास करत असून लवकरच आरोपीचा माग काढण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.