Published On : Mon, Oct 11th, 2021

‘मिशन कवच कुंडल’ अंतर्गत दोन दिवसात ३१ हजारावर लसीकरण

Advertisement

नागपूर : कोव्हिडच्या संभाव्य लाटेचा धोका आणि त्याअनुषंगाने नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरात राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेंतर्गत ९ व १० ऑक्टोबर रोजी शहरात पहिला व दुसरा असे एकूण ३१७२४ लसीकरणाचे डोज देण्यात आले.

८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान शहरात लसीकरणासाठी ‘मिशन कवच कुंडल’ ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत मनपाची आरोग्य चमू सज्ज आहे. प्रभागनिहाय लसीकरणाबाबत मनपाची चमू कार्य करीत असून याकरिता आरोग्यसेविका, अधिपरिचारिका, डॉक्टर्स, इंटर्नस यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सुद्धा सहकार्य करीत आहेत.

Advertisement

‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेद्वारे ९ व १० ऑक्टोबरला १३०८८ नागरिकांनी पहिला डोज घेतला तर दोन दिवसात १८६३६ जणांनी दुसरा डोज पूर्ण केला. ९ ऑक्टोबरला ६६८५ जणांनी पहिला तर ११५३३ जणांचा दुसरा डोज पूर्ण झाला. रविवारी १० ऑक्टोबर रोजी ६४०३ जणांनी पहिला व ७१०३ जणांचे दोन्ही डोज पूर्ण झाले. अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी दिली.

कोरोनाच्या संसर्गापासून बचावाचे लसीकरण हेच मोठे शस्त्र आहे. १४ ऑक्टोबरपर्यंत शहरात ‘मिशन कवच कुंडल’ मोहिम राबविली जात आहे. याअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घेउन मनपाच्या १५५ लसीकरण केंद्रांपैकी आपल्या जवळच्या केंद्रात जाउन आपले लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement