Published On : Mon, Oct 11th, 2021

वीर सावरकर उद्यान दुरूस्तीचे काम तात्काळ पूर्ण करा : राजेंद्र सोनकुसरे

Advertisement

माजी महापौर संदीप जोशी यांच्या नोटीसवर स्थापत्य समिती सभापतींनी केली पाहणी

नागपूर : लक्ष्मीनगर झोन अंतर्गत वीर सावरकर उद्यान नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने सुसज्जीत करून उद्यानाची देखभाल, दुरूस्ती यासह येथील सुरक्षा भिंतीचे काम, प्रवेश द्वारावर नामफलक आदी सर्व कामे तात्काळ पूर्ण करा, असे निर्देश स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये माजी महापौर संदीप जोशी यांनी वीर सावरकर उद्यानाच्या दुरावस्थेबाबत नोटीसद्वारे अवगत केले होते. त्याअनुषंगाने महापौरांच्या निर्देशानुसार सोमवारी (ता.११) स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी प्रत्यक्ष उद्यानात जाउन पाहणी केली. त्यावेळी माजी महापौर संदीप जोशी, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार उपस्थित होते.

यावेळी संदीप जोशी यांनी वीर सावरकर उद्यान बाबतच्या समस्येसंदर्भात अवगत करुन आवश्यक सूचना केल्या. लवकर हे काम चालू करावे असेही सांगितले. यासंदर्भात उद्यान विभागाद्वारे तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश स्थापत्य समिती सभापतींनी दिले. सभापतींच्या निर्देशानंतर उद्यान अधीक्षकांनी तात्काळ कंत्राटदाराला उद्यानाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली.