Published On : Tue, Oct 5th, 2021

मरियमनगरमधील आरोग्य शिबिराचा ३०० नागरिकांनी घेतला लाभ

Advertisement

नागपूर महानगरपालिका, चेंबर ऑफ कॉमर्सचे आयोजन

नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मरियम नगर येथील चेंबर कार्यालय परिसरात आयोजित आरोग्य शिबिराचा सुमारे ३०० नागरिकांनी लाभ घेतला.

शिबिराचे उद्‌घाटन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते झाले. यावेळी धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, आमदार गिरीश व्यास, हेमंत गांधी, नगरसेवक निशांत गांधी, माजी महापौर तथा नगरसेवक संदीप जोशी, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, संजय बंगाले, नगरसेविका उज्ज़्वला शर्मा, मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, रामअवतार तोतला, संजय अग्रवाल, सचिन पुनियानी, उमेश पटेल, संतोष काबरा, महेश कुकडोजा, कृष्णा पांडे, अशोक मुंदडा उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागपूर महानगरपालिकेतर्फे आरोग्य विभागातर्फे सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात विविध ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर, दंतरोग चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. महापौर नेत्रज्योती योजना, महापौर दृष्टि सुधार योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येत आहे. या शहराचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी शक्य ते प्रयत्न केले जात असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिली.

शिबिरात डॉक्टरांच्या चमूने विविध रोगांची तपासणी केली. शिबिराचे संयोजन नगरसेवक निशांत गांधी यांनी केले होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी छात्र जागृतीच्या कार्यकर्त्यांसोबतच कृष्ण पांडे, विनोद माहुले, रोशन कोकडे, संजय हसीब, प्रतिमा अनिवाल, राजू मलावे, प्रकाश शर्मा, अरुण मेंढी, पंकज पटेल, अमोल पाठक, प्रशांत पाठक, विजय तिवारी आदींनी सहकार्य केले.