Published On : Thu, Aug 27th, 2020

रामटेक ग्रामीण मध्ये 3 तर रामटेक शहरात 15 रुग्ण कोरणा पॉझिटिव्ह आढळले

रामटेक: दिवसेंदिवस कोरोणा रुग्णांची संख्या वाढतच चालली असून , रामटेक ग्रामीण मध्ये 3 तर रामटेक शहरात 15 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहे. मणसर ,पिंडकापार, आणि नगरधन येथे प्रत्येकी एक एक रुग्ण आढळले आहे.

पिंडकापार येथील 22वर्षीय महिला ही आपल्या माहेरी गेली असता तिथे तिचा भाऊ पॉझिटिव आढळला ती हाय रिस्क मधे असल्यामुळे तिची चाचणी केली असता ती महिला पॉझिटिव आढळली.

त्या हॉस्पिटल मधील एक महिला सफाई कर्मचारी व लेबोरेटरी असिस्टन व रामटेक तालुक्यातील पिंडकापार येथे 30 वर्षीय महिला अशे ऐकून रामटेक तालुक्यात 3 तर शहरातील 15 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.


या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची शोधा शोध घेणे सुरू आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ चेतन नाईकवार यांनी माहिती दिली.
दिवसां दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. तालुक्याची कोरोना रुग्णसंख्या 144 वर पोहोचली आहे.

तहसीलदार बाळासाहेब मस्के , वैदकीय अधीक्षक डॉक्टर प्रकाश उजगरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाइकवार, हे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.