Published On : Thu, Jul 4th, 2019

महावीरनगरात 3 लक्ष 17 हजाराची घरफोडी

कामठी : -स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील महावीर नगरातील एका कुलूपबंद घरातील घरमंडळीं बाहेर गेले असल्याचे संधी साधून अज्ञात चोरट्यानी अवैधरित्या घरात प्रवेश करून घरातील आलमारीत सुरक्षित ठेवलेले नगदी 5 हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने असे एकूण मिळून 3 लक्ष 17 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना 2 जुलै ते 3 जुलै दरम्यान सकाळी साडे नऊ वाजेदरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी प्रशांत मेघराज टिकले वय 31 वर्षे रा महावीर नगर रणाळा यांनी स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावरुद्ध भादवी कलम 454, 457, 380 अनव्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी प्रशांत टिकले हे आपल्या पत्नीसह उपचारार्थ कामी 2 जुलै ला सकाळी 8 वाजता नागपूर ला कुलूपबंद लावून निघाले व 3 जुलै ला सकाळी साडे नऊ वाजता घरी परतले असता अज्ञात चोरट्यानि संधी साधून घरात अवैधरित्या प्रवेश करून बेडरूम मधील लाकडी कपाटात सुरक्षित ठेवलेले सोन्याचे दागिने व नगदी 5 हजार रुपये असा एकूण 3 लक्ष 17 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने पीडित फिर्यादी घरमालकाने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी