Published On : Thu, Jul 4th, 2019

अबब रेल्वे डब्यापेक्षा मोठा ७४ चाकी पुल्लर हॉयड्रोलिक ट्रेलर

पुल्लर हायड्रोलिक ट्रेलर महामार्गा ने चालविणे चालकांची चांगलीच कसरत.

कन्हान : – एम एच के एस पेट्रोल पंप जवळ डिझेल भरण्याकरिता थांबला विशाखापट्टम येथुन इंडियन ऑईल रिफाईंड्री चा १३५ फिट लांब बॉयलर पानीपत ला नेताना ७४ चाकी पुल्लर हायड्रोलिक ट्रेलर जो रेल्वे गाडीच्या डब्यापेक्षा मोठा असुन एक महिना महामार्गाने प्रवास करून पानिपत ला पोहचविता चालकांची चांगलीच कसरत होणार आहे.

बाळ रोडलाईन प्रा.लि.मुंबई चा ७४ चाकी पुल्लर हॉयड्रोलिक ट्रेलर विशाखा पट्टम आंध्र प्रदेश येथुन इंडियन ऑईल रिफाईंड्री चा ४१ मिटर म्हणजे १३५ फिट लांब बॉयलर घेऊन पानीपत हरियाणा ला महामार्गाचा प्रवास १५ दिवसा अगोदर सुरू करून (निघुन) बुधवार (दि.३) ला सायंकाळी ५ वाजता एम एच के एस पेट्रोल पंप वराडा जवळ डिझेल भरण्याकरिता थांबला.

हे दोन ७४ चाकी पुल्लर हॉयड्रोलिक ट्रेलर क्र. एम आर ७४ – ११११ व एन एल ०१ ए ए २६७२ आणि एक पायलट गाडी सोबत आहे. महेंद्र यादव व शाहीद अली दोघे सुपर चालक असुन सहा सहा सहकारी मदतनीस म्हणुन आहेत. पायलट गाडी वर एक चालक व एक सुपरवाईझर आहे. दररोज ७० ते ८० कि मी अंतर चालत असुन एका महिन्यात हरियाणा राज्यातील पानिपत येथे शिताफितीची कसरत करित पोहचणार आहे.अशी माहिती दोन्ही सुपर हॉयड्रोलिक ट्रेलर चालक महेंद्र यादव व शाहिद अली हयानी दिली.