Published On : Tue, Jun 18th, 2019

आरटीईच्या दुसऱ्या फेरीत 270 विद्यार्थ्यांची लागली लॉटरी

Advertisement

कामठी :-शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटी ई)इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये राखिव जागा असणाऱ्या 25 टक्के जागांवर मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून नुकतेच एक दिवसांपूर्वी निघालेल्या राज्यस्तरीय दुसऱ्या फेरीत कामठी तालुक्यातील 270 विद्यार्थ्यांना लॉटरी लागली आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागेवर आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्याना प्रवेश दिले जातात .सन 2019-20या शैक्षणिक वर्षासाठी 25 टक्के आर टी ई प्रवेश प्रक्रियेसाठी कामठी तालुक्यातील 40 शाळांची नोंदणी करण्यात आली असून नर्सरी साठी 50 व पहिली वर्गासाठी 480 असे एकूण 530 जागा असून पहिल्या ड्रा मध्ये 276 विद्यार्थ्यांना लॉटरी लागली असून त्यातील 211 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर 3 प्रवेश रद्द झाले तर 62 विद्यार्थ्यांनी प्रवेश च घेतलेले नाहीत तर दुसऱ्या लॉटरी मध्ये लागलेल्या 270 विद्यार्थ्यांपैकी आजपर्यंत 93 विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज आले आहेत.दुसऱ्या फेरीत लॉटरी लागलेल्या पाल्यांच्या पालकांना या फेरीत निवड झाल्याबाबतचे संदेश पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

ज्या पालकांना प्रवेशाचे संदेश आले नाहीत अशा पालकांनी आरटीई च्या संकेतस्थळावर जाऊन अर्जनिहाय डिटेलमध्ये जाऊन अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली आहे का ,याची शहनिशा करावी , केवळ संदेशावर अवलंबून राहू नये असे आव्हान गटशिक्षण अधिकारी कश्यप सावरकर यांनी केले आहे.

बॉक्स:-यावर्षीच्या 2019-20शैक्षणिक वर्षात आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी कामठी तालुक्यात 40 शाळांची निवड करण्यात आली असून नर्सरी प्रवेशसाठी 50 व पहिली वर्ग प्रवेश साठी 480 असे एकूण 530 जागांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यानुसार आतापर्यंत निघालेल्या दोन लॉटरीत 546 विद्यार्थ्यांची लॉटरी लागली आहे त्यातील 62 विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला नसला तरी उद्दिष्टपूर्तीसाठी निघणाऱ्या तिसऱ्या लोटरीत मोजक्याच विद्यार्थ्यांची लॉटरी लागणार हे इथं निश्चित!

संदीप कांबळे कामठी