Published On : Tue, Jun 18th, 2019

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उन्हाळी शिबिराचा थाटात समारोप

Advertisement

कामठी:-समग्र शिक्षा-समावेशीत शिक्षण उपक्रम अंतर्गत कामठी पंचायत समिती चे प्रभारी गटशिक्षण अधिकरो कश्यप सावरकर यांच्या मार्गदर्शनार्थ शिक्षण विभागाच्या वतीने येथील सरस्वती शिशु मंदिर उच्च प्राथमिक शाळेत 10 जून ते 15 जून 2019 पर्यंत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शिबिरात दररोज 10 च्या जवळपास दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या शिबिराचा नुकताच थाटात समारोप करण्यात आला.

या शिबिरात दिव्यांग मुलांना वेगवेगळे कलाकौशल्य, योगा, नृत्य, हस्तकला, व मनोरंजनात्मक कौशल्य ,चित्रकला आदी कलांचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच शिबिराच्या समारोपीय एक दिवसांपूर्वी सर्व समावेशीत शिक्षण चमू आणि गटशिक्षण अधिकारी कश्यप सावरकर, शिक्षण विस्तार अधिकारी आनंद राखडे, यांनी शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांसह जगप्रदिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे आनंददायी वातावरणात भेट दिले तसेच सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन मुलांना प्रोत्साहित केले तसेच शिक्षण विभागाने या प्रकाराचे नियोजन नेहमी करण्याबाबतचे मनोगत गटशिक्षण अधिकारी सावरकर यांनी व्यक्त केले.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शुभांगी ठाकरे, विशेषतज्ञ जुगलकिशोर डोरलीकर, मिलिंद मानकर, संजय भिवगडे, सारिका मेहर, संगीता अहिरकर, यांनी विशेष प्रयत्न करीत मोलाची भूमिका साकारली.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement