Published On : Sun, Aug 18th, 2019

खरबी आरोग्य शिबिरात 2512 रुग्णांची तपासणी

Advertisement

श्री श्री फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम
दहा शिबिरांमधून 21 हजार रुग्णांना मिळाला लाभ

नागपूर: श्री श्री फाऊंडेशन कोराडी या सामाजिक संस्थेतर्फे बेसा येथे आयोजित आरोग्य शिबिरात आज 2512 रुग्णांची तपासणी करण्यात आली व आवश्यक त्या रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आतापर्यंत झालेल्या 10 शिबिरांमध्ये 21 हजारापेक्षा अधिक रुग्णांना या शिबिराचा लाभ झाला.

याप्रसंगी जि.प. सदस्य, शुभांगी गायधने, सरपंच भोला कुरटकर, नरेश भोयर, अजय बोधारे, राजकुमार वंजारी, मडामे, उपसरपंच नरेंद्र चाफेकर, नरेंद्र नांदूरकर, श्री श्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संकेत बावनकुळे, नामदेव नांदूरकर, पप्पू ठाकूर, सुरेंद्र बानाईत, कमलाकर शेंडे, सचिन इंगळे, रमेश तिडके, दिलीप चापेकर, कैलास ठाकरे, सतीश यादव, डॉ. प्रीती मानमोडे उपस्थित होते.

शिबिरात जनरल सर्जरी विभागाने 123 रुग्णांची तपासणी केली. दंत विभागान 162 रुग्णांची तपासणी, तर नेत्र चिकित्सकांनी 599 जणांची तपासणी केली, शस्त्रक्रिया विभागाने 63 जणांवर साधारण शस्त्रक्रिया केली. 113 नागरिकांनी ईसीजी तपासणी करवून घेतली. जनरल मेडिसिन विभागाने 138 जणांची तपासणी केली. 240 जणांनी रक्त तपासणी करवून घेतली. 345 जणांनी मधुमेह तपासणी करवून घेतली, आर्थोपेडिक विभागाने 192 जणांची तपासणी केली. 17 रुग्णांची मेंदूची तपासणी करण्यात आली. जनरल मेडिसिन विभागाने 66 तर कर्करोग तज्ञांनी 24 जणांची तपासणी केली. मूत्ररोग विभागाने 33 जणांची, हृदयरोग तज्ञांनी 76 जणांची, स्त्री रोग तज्ञांनी 103 महिलांची तर छाताच्या विकाराच्या तज्ञांनी 126 जणांची तपासणी केली.

डॉक्टरांच्या चमूमध्ये डॉ. मनीषा राजगिरे, डॉ. अमोल पाटील, डॉ. पराग देशमुख, डॉ. स्वाती वानीकर, डॉ. वृषाली नवलकर, डॉ. श्वेता ठाकरे, डॉ. गुंडावार, डॉ. वणीकर, डॉ. गुरु, डॉ. वर्घने, डॉ. कपिल देवतळे, डॉ. राहूल लामसोंगे, डॉ. पाटील, डॉ. हजारे, डॉ. संदीप, डॉ. देशमुख, डॉ. रघुवंशी, डॉ. भोयर, डॉ. गिल्लूरकर हॉस्पिटलची टीम आदींचा सहभाग होता.

शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री श्री फाऊंडेशनतर्फे महेश बोंडे, राजूभाऊ गोल्हर, अरुण सावरकर, हर्षल हिंगणीकर, विकास धारपुडे, प्रीतम लोहासारवा, बापूराव सोनवने, रोहित पंचबुध्दे, विनोद मोरे, सुजीत महाकाळकर, सचिन घोडे, कपिल गायधने आदींनी प्रयत्न केले.