Published On : Mon, Apr 16th, 2018

राज्यातील २५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या


मुंबई: राज्य सरकारने आज राज्यातील तब्बल २५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये अतिक्रमणविरोधी कारवाईच्या धडाक्यामुळं गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची अखेर बदली झाली आहे. त्यांच्या जागी गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सुधाकर शिंदे यांच्याविरोधात पनवेल महापालिकेतील भाजपने अविश्वास ठराव आणला होता. हा ठराव राज्य सरकारने निलंबितही केला होता. मात्र अखेर त्यांची बदली करण्यात आली आहे. याचबरोबर, पुणे महापालिकेलाही नवा आयुक्त मिळाला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सौरव राव यांच्याकडं पुण्याची सूत्रे देण्यात आली आहेत.

नव्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे

लक्ष्मीनारायण मिश्रा – जिल्हाधिकारी (वाशिम),

राहुल द्विवेदी – जिल्हाधिकारी (अहमदनगर)

आचल गोयल – मुख्य कार्यकारी अधिकारी (रत्नागिरी)

शेखर चन्ने – परिवहन आयुक्त (निवडणूक आयोगाचा अतिरिक्त कारभार)

नवलकिशोर राम – जिल्हाधिकारी (पुणे)

सुनील चव्हाण – जिल्हाधिकारी (औरंगाबाद)

डॉ. सौरव राव – महापालिका आयुक्त (पुणे)

डॉ. एस. एल. माळी – महापालिका आयुक्त (नांदेड)

माधवी खोडे-चावरे – महिला आणि बालकल्याण आयुक्त

एस. राममूर्ती – महाव्यवस्थापक, खाण महामंडळ (नागपूर)

डॉ. संजय यादव – मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला जिल्हा परिषद

सीएल पुलकुंडवार – सहसंचालकीय व्यवस्थापक, एमएसआरडीसी

निरुपमा डांगे – जिल्हाधिकारी, बुलडाणा

सुधाकर शिंदे – मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जनआरोग्य योजना

गणेश देशमुख – महापालिका आयुक्त, पनवेल

डॉ. बिपिन शर्मा – संचालकीय व्यवस्थापक, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी, पुणे

रुचेश जयवंशी – दिव्यांग कल्याण आयुक्त, पुणे

एन. के. पाटील – प्रशिक्षण

डॉ. ए. एम. महाजन – पाणी पुरवठा विभाग

एस. आर. जोंधळे – जिल्हाधिकारी, मुंबई शहर

एम. जी. अर्दाड – महापालिका आयुक्त, अहमदनगर

जी. सी. मांगले – व्यवस्थापकीय संचालक, महानंद

पवनीत कौर – जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद

एच. मोडक – अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्त, नागपूर