Published On : Mon, Jun 17th, 2019

मृत कर्मचाºयाच्या कुटुंबाला २४ लाखांची मदत

मालगाडीने कटून ट्रॅकमॅनचा मृत्यू, विभागीय रेल्वे व्यवस्थापक उप्पल यांनी घेतली दखल

नागपूर : कर्तव्यावर असताना कर्मचाºयाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर कागदोपत्री कारवाईसाठी बराच वेळ लागतो. सहा आठ महिणे निघून गेल्यानंतर मृताच्या कुटुंबाला सेटेलमेंटची रक्कम मिळते. असे आजवर पाहण्यात आले. मात्र, मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एम.एस. उप्पल यांनी अवघ्या २४ तासाच्या आत रेल्वे अपघातात मृत झालेल्या कर्मचाºयाच्या कुटुंबाला २४ लाखांची मदत करीत भारतीय रेल्वेच्या इतिहसात नोंद केली आहे.

रेल्वे रुळावर कर्तव्यावर असताना वरिष्ठ तांत्रिक कर्मचारी धर्मपाल महादेव यांचा हिंगणघाट येथील वाघोली सेक्शन दरम्यान मालगाडीने शनिवार १५ जून ला अपघातील मुत्यू झाला. या घटनेची मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयाने त्वरीत दखल घेतली. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करीत महादेव यांचे कुटूंबांला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार विभागीय रेल्वे व्यवस्थापक एम.एस. उप्पल यांच्या मार्गदर्शनानुसार एक समिती नेमण्यात आली.


समितीने मृत रेल्वे कर्मचाºयाच्या नोकरीच्या कमी कालावधीत रिलीफ फंड सेवा दिली. तसेच एसओडीची एक समिती रात्री नेमून सर्व कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करीत दुसºयाच दिवशी म्हणजे १६ जून पर्यंत पूर्ण करण्यात आली. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा सेटेंलमेंट रक्कम २४ तासाच्या आत रेल्वे कर्मचाºयाच्या कुटूंबाला देण्यात आली. यावेळी रेल्वे प्रशासनाने एकून २३ लाख ४१ हजार ४८५ रुपये दिले.

याशिवाय रेल्वे प्रशासनाने मृत रेल्वे कर्मचाºयाच्या कुटूंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. याकरिता वरिष्ठ डीईन प्रविण पाटील (सीओ), नगराळे (एस), चंद्रकांत कदम (डीएफएम), जी.पी.भगत (डीपीओ), सांझी जैन एपीओ (डब्ल्यू), एम.काशिमकर (एपीओ), एस.डी.सहारे (एडीएमफ) आणि पाल (एडीईएन) यांनी या सर्व प्रक्रिया करण्याकरिता आणि मृत रेल्वे कर्मचाºयाच्या कुटूंबाला मदतीसाठी प्रयत्न केले.