टोळी सक्रिय, प्रवाशांची सुरक्षा धोक्यात, किती गुन्ह्याचा छडा लागला?
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक सीसीटिव्ही यंत्रणा लावण्यात आली आहे. दोन सुरक्षा यंत्रणा आहेत. सर्व अनाधिकृत प्रवेशव्दार बंद करण्यात आले. अशा स्थितीतही मोबाईल चोरांची टोळी सक्रिय असून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सततच्या चोºयांमुळे प्रवाशांची सूरक्षा धोक्यात आली आहे. रेल्वे तिकीट केंद्र, प्रतिक्षालय,फलाट आदी ठिकाणी गाड्यांच्या प्रतिक्षेत असताना प्रवाशांचे मोबाईल लंपास केले जात आहेत. यातील किती गुन्ह्यांचा छडा लागला हे मात्र, कोडेच आहे.
रामअवतार अमरसिग गुजर (१९, रा. खेडा, मध्यप्रदेश) हा अमरावती जाण्याकरिता नागपूर रेल्वेस्थानकावर आला होता. रात्री ट्रेन नसल्याने त्याने फलाट क्रमांक १ वर मुंबई एंड कडे विश्रांती घेतली. दरम्यान त्याला साखर झोप लागली. त्याच्या झोपेचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांचा १० रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केला.
दुसºया घटनेत बिहारी भैय्याजी आग्रे (३२, रा. सौसद, छिंदवाडा) हे पुणेला जाण्याकरिता नागपूर रेल्वेस्थानकावर आले होते.आरपीएफ ठाण्या जवळील रेल्वे तिकीट केंद्र परिसरात मोबाईल चार्जिगला लावून झोपले असता अज्ञात चोरट्याने त्यांचा ५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरला. तिसºया घटनेत कुरबान शबीर तडवी (३७, रा. नागपूर) हे भुसावळ जाण्याकरिता नागपूर रेल्वेस्थानकावर आले होते. गाडीला उशीर असल्याकारणामुळे ते फलाट क्रमांक ७ आराम करता करता झोपी गेले. त्यांच्या झोपीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांचा ४ हजार ५०० रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केला.
चवथ्या घटनेत फिर्यादी राजकुमार बेदीरामपाल (३७, रा. कळमना मार्केट, नागपूर) हे नागपूर येथून शिर्डी जाण्याकरिता आले होते. ट्रेन उशीरा असलल्याने पूर्व प्रवेशव्दार (संत्रामार्केट) रेल्वे तिकीट केंद्र परिसरात आराम करीत असताना त्यांच्या झोपेचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्याचा २६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि रोख ९ हजार ५०० रुपये असा एकून ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
तर पाचव्या घटनेत सनी कुमार श्रवन शर्मा (३४, रायपूर) साईनगर ते रायपूर असा प्रवास करीत होते. नागपूर साईनगर एक्सप्रेस मध्ये गाडीत चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांचा ७३ हजार ९०० रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केला. फिर्यादींच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.