Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

| | Contact: 8407908145 |
Published On : Fri, Aug 10th, 2018

७ गळत्यांच्या दुरुस्तीसाठी कन्हान जलशुद्धीकरण केंद्रात ११ ऑगस्ट रोजी २४ तासांचे शटडाऊन

नागपूर: वाया जाणारे पाणी वाचवण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या १३०० व ९०० मिमी फीडर मेन्सवरील ७ गळत्या दुरुस्त करण्याची योजना आखली आहे.

या गळत्या तातडीने बंद करणे अत्यावश्यक आहे. यासाठी मनपा-OCW ने दुरुस्तीचे २४ तासांचे काम ११ ऑगस्ट सकाळी १० ते १२ ऑगस्ट सकाळी १० दरम्यान घेण्याचे ठरवले आहे.

या शटडाऊन दरम्यान लकडगंज, आशीनगर, सतरंजीपुरा, नेहरू नगर हे कन्हान वरून पाणीपुरवठा होणारे झोन्स बाधित राहतील. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळचा पाणीपुरवठाही काही अंशी बाधित राहील.

या भागातील जलकुंभ यादरम्यान पूर्णपणे कोरडे होणार असल्याने टँकर पुरवठाही शक्य होणार नाही. नागरिकांनी कृपया आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा.

मनपा-OCW ५ मोठ्या गळत्या कामठी कॅन्टॉनमेंट भागात तर प्रत्येकी एक एक गळती कळमना जलकुंभाजवळ आणि ऑटोमोटिव्ह चौकाजवळ दुरुस्त करणार आहे.

यादरम्यान बाधित राहणारे जलकुंभ खालीलप्रमाणे:

लकडगंज झोन: भांडेवाडी जलकुंभ, देशपांडे लेआऊट जलकुंभ (भरतवाडा), लकडगंज, मिनिमाता नगर, सुभान नगर, कळमना जलकुंभ व पारडी १ व २ जलकुंभ

आशीनगर झोन: बिनाकी (महेंद्र नगर), बिनाकी १ व २, गमदूर डायरेक्ट टॅपिंग, आकाशवाणी डायरेक्ट टॅपिंग, जसवंत मॉल डायरेक्ट टॅपिंग, इटाभट्टी डायरेक्ट टॅपिंग

सतरंजीपुरा झोन: शांती नगर जलकुंभ, वांजरी, बस्तरवारी, १० नं. पुलीया डायरेक्ट टॅपिंग , इंदोरा चौक डायरेक्ट टॅपिंग.

नेहरू नगर झोन: नंदनवन जुने, १ व २ जलकुंभ, सक्करदरा १, २ व ३ जलकुंभ, ताजबाग जलकुंभ, खरबी डायरेक्ट टॅपिंग व भांडे प्लॉट डायरेक्ट टॅपिंग

कन्हान जलशुद्धीकरण केंद्र २४ तास बंद राहणार असल्याने मनपा-OCW यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे व कुठल्याही तक्रारींसाठी मनपा-OCWच्या टोलफ्री क्रमांकावर १८००२६६९८९९ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Stay Updated : Download Our App
Mo. 8407908145