Published On : Sat, Jun 15th, 2019

मनपा-OCWची टुल्लू पंप विरोधात कार्यवाही जोमात

Advertisement

नागपूर : नागपुरातील उन्हाचा पारा 47 डिग्रीच्या आसपास पोचलेला आहे. अशावेळी अनेकदा लोक बेकायदेशीररीत्या बूस्टर (टुल्लु) पंप वापरून जास्तीचे पाणी घेण्यास सुरुवात करत असल्याचे चित्र दिसून येते. अशातऱ्हेने हे लोक इतरांसाठीचे पाणी हिसकावून घेत असतात.

हे केवळ बेकायदेशीरच नसून अनैतिकदेखील आहे. बूस्टर पंपाचा वापर मनपाच्या पाणी उपविधीनुसार दंडनीय अपराध आहे व असा वापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येऊ शकते. यावर्षी, मनपा-OCWने बूस्टर पंप वापरणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई तसेच नळजोडणी स्थगितीची कारवाई करण्याचे ठरवले आहे

येथे उल्लेखनीय आहे कि, नागपूर पोळीचे आणि , नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी , वॉटर यांनी बूस्टर पंपाचा सर्रास वापर होणारे भाग ओळखून ठेवलेले आहेत. झोन-निहाय विशेष चमू घरावर छापा मारणे, पंप जप्ती व कायदेशीर कारवाईसाठी तक्रार नोंदवणे या कामी लावण्यात आलेल्या आहेत. मनपा पाणीपट्टी दर उपविधीनुसार बूस्टर पंप अथवा तत्सम उपकरण वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते.

येथे उल्लेखनीय आहे कि, नुकत्याच सुरु झालेल्या पंप जप्ती मोहिमेच्या अंतर्गत मनपा-OCWने जवळपास 215 पंप जप्त