Published On : Wed, Mar 11th, 2020

202 रक्तदात्यांनी केले स्वेच्छेने रक्तदान

कामठी:-,कर्बला च्या शहीदाच्या आठवणीसमूर्ती निमित्त येथील हैदरी चौकात अली ग्रुप च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले ज्यामध्ये 202 रक्तदाताणी स्वेच्छेने रक्तदान केले.

या रक्तदान शिबिराला रक्तसंकलन साठी -सिटी हॉस्पिटल ब्लड बँक कामठी यांनी वैद्यकीय सेवा पुरविली .याप्रसंगी अली ग्रुप चे संचालक कामरान भाई जाफ़री व मुस्लिम रजा यांनी हे रक्तदान शिबिर मागील 11 वर्षो पासून सतत घेण्यात येत असून दरवर्षी रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त होत असल्याचे मनोगत व्यक्त केले.

या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी अली गुप च्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

संदीप कांबळे कामठी