Published On : Wed, Mar 11th, 2020

इको फ्रेंडली वातावरणात होळी पर्व उत्साहाने साजरा

कामठी:-दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा होळी या पर्वानिमित्त 9मार्च ला तालुक्यात विविध संघटनेच्या वतीने वाईटाचा नायनाट करणे या भूमिकेतून सार्वजनिक तसेच खाजगी होळी जाळून होलिकादहन कार्यक्रम साजरा करण्यात आला तर होलिका दहन झाल्यानन्तर वाईटाचा नायनाट केल्याच्या आनंदात 10मार्च ला धुलीवंदनाचा दिवस हा आनंदाचामौजमस्तीचा असून बुरा ना मानो होली है या म्हणीनुसार एकमेकांना रंग लावीत गुलालाची उधळण करीत धुळीवनदानाचा दिवस हा इकोफ्रेंडली व खेळीमेळीच्या वातावरणात मोठ्या उत्साहाने पार पडला.

होळीचा सन म्हटला की तो आनंदाचा सन असतो सर्वच जण या सणाच्या प्रतीक्षेत असतात तर काही ठिकाणी धुळवडीच्या दिवशी मारामाऱ्या, भांडणे होत असल्याने या सनाला गालबोट लागीत असतात तर होळीच्या दुसरा दिवस धुळीवदन चा दिवस हा पोलिसांच्या खऱ्या परीक्षेचा दिवस असतो त्यामुळे स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या वतीने स्थानिक पोलीस अधिकारी कर्मचारी सह अतिरिक्त अधिकारी कर्मचारी तसेच राज्य राखीव पोलिस बल पथक बोलावून ठिकठिकानी पोलीस बंदोबस्त लावून विशेष लक्ष केंद्रित करीत खबरदारी घेतली तर वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने खबरदारी घेत ट्रिपल सीट वाहतुक तसेच ड्रॅक अँड ड्राइव करणारीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते परिणामी हा पर्व मोठ्या उत्साहाने पार पडले यानुसार वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक यादव यांच्या नेतृत्वात येथील रनाळा, ट्राफिक बूथ चौक, जयस्तंभ चौक, मोटर स्टँड चौक, गरुड चौक आदी ठिकाणी वाहतूक दारांची मद्य अंश तपासणी करोत एकाच दिवशी बहुतांश मद्यपिवर ड्रन्क अँड ड्राइव्ह चे कारवाही करण्यात आली .

Advertisement

या रंगोत्सवाच्या यशस्वीतेसाठी डीसीपी निलोत्पल व एसीपी राजरत्न बन्सोड यांच्या मार्गदर्शनार्थ नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल , दुययम पोलीस निरीक्षक राधेश्याम पाल ,जुनी कामठी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाडे , दुय्यम पोलीस निरीक्षक परदेसी यांच्या नेतृत्वात संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाची कर्तव्यदक्ष भूमिका साकारली.

Advertisement

संदीप कांबळे

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement