ना. गडकरींच्या हस्ते वितरित
नागपूर: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसतर्फे शहरातील विविध रुग्णालयांना 20 व्हेंटिलेटर आज नि:शुल्क देण्यात आले. यापैकी स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन खापरी येथील रुग्णालयाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 5 व्हेटिलेटर देण्यात आले.
तसेच ओमेगा हॉस्पिटलला 3, मातृसेवा संघाला 3, केअर हॉस्पिटलला 3, विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसला 2, शुअरटेक हॉस्पिटलला 2, सेनगुप्ता हॉस्पिटलला 2 व्हेंटिलेटर देण्यात आले.
व्हेंटिलेटरचा पहिला सेट स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन खापरी यांना देण्यात आला. यावेळी डॉ. दिलीपजी गुप्ता, टीसीएसचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख हर्षल गजघाटे, व्यवस्थापक रेवती मुलमुले आदी उपस्थित होते.
Advertisement

Advertisement
Advertisement