Published On : Tue, Sep 28th, 2021

विद्यापीठामधील सर्व अभ्यासक्रमाच्या २०% जागा वाढवण्यात याव्या : भाजयुमोची कुलगुरूंना विनंती.

Advertisement

कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच २०% जागा वाढवण्यात येईल असे दिले आश्वासन..!

आज भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी नागपुर महानगरातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. सुभाष चौधरी यांना विद्यापीठामधील सर्व अभ्यासक्रमाच्या २०% जागा वाढवण्यात याव्या या करीता निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासुन विद्यापीठामध्ये प्रवेशाकरीता जागा कमी असल्यामुळे प्रवेश मिळणे कठीण होत असल्याची तक्रारी अनेक विद्यार्थ्यांकडुन प्राप्त झाल्या.

रातुम विद्यापीठात सर्व आभ्यासक्रमात कमी असल्यामुळे स्थनिक विद्यार्थ्यांना नाईलाजाने इतर विद्यापीठात जावे लागते. अश्या सर्व समस्यांबाबत कुलगुरूंना अवगत केली. कुलगुरूंनी निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर प्रवेशाकरीता २० टक्के जागा वाढविण्यात येईल असे आश्वासन यावेळी कुलगुरुंनी भाजयुमो विद्यार्थी आघाडीला दिले.

निवेदन प्रामुख्याने भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके, भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे यांच्या मार्गदर्शनात व भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

यावेळी भाजयुमो शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, संपर्कमंत्री मनिष मेश्राम, विद्यार्थी आघाडी संयोजक संकेत कुकडे, सह-संयोजक गौरव हरडे, आशिष मोहिते, शिवम पांढरीपांडे, प्रशांत बघेल, एजाज शेख, राहुल सावडीया, तेजस भागवतकर, गोविंद गडगीलवार उपस्थित होते.