Published On : Thu, Apr 9th, 2020

मानसिक तणावातून 2 वर्षोय बालिकेच्या आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी सम्राट नगर येथे माहेरी आलेल्या 2 वार्षिय बालिकेच्या आईने माणसीक तणावातून घराजवळील एका सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना आज पहाटे 4 वाजता घडली असून मृतक महिलेचे नाव करिश्मा जयकुमार बिहारी वय 26 वर्षे रा कुंभारे कॉलोनी कामठी असे आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक महिलेचे 2015 मध्ये लग्न झाले असून सासर हे वर्धे चे होते मात्र काही दिवसांपासून पतो वर असलेल्या संशयातून नेहमी मानसिक तणावात राहत होती दरम्यान हिला मृतक महिलेचा भाऊ महेश प्रजापती ने कामठी ला स्वतःच्या घरी जानेवारी 2020 मध्ये आणले तरीसुद्धा हिचा तणाव काही कमी होत नव्हता याच माणसीक तणावातून आज पहाटे ला घरमंडळी घरात गाढ झोपेत असतेवेळी या महिलेने आपल्या 2 वर्षीय छकुलीची कुठलिही पर्वा न करता नजीकच्या सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली .

पहाटे घरमंडळी उठल्यावर सदर महिला घरात म दिसल्याने शोध घेतला असता विहिरी जवळ मृतक महिलेची चप्पल दिसली यावरून शोध वाढवून विहिरीत शोध घेतला असता महिलेने आत्महत्या केल्याचे निष्पन्न होताच त्वरित स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन ला माहिती देण्यात आली यावरून फिर्यादी महेश प्रजापती ने दिलेल्या तक्रारी वरून घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.


संदीप कांबळे कामठी