Published On : Mon, Dec 16th, 2019

श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी

तेली समाज पंच कमेटी कन्हान- कांद्री

कन्हान : – श्री संताजी सभागृह कन्हान – कांद्री येथे श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती तेली समाज पंच कमेटी कन्हान – कांद्री द्वारे थाटात साजरी करण्यात आली.

श्री संताजी सभागृहात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमे ला माजी जिला परिषद उपाध्यक्ष. श्री. शरद डोणेकर व झिबल सरोदे यांच्या हस्ते श्री संताजी जगनाडे महाराजाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलि त करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. श्री संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली.


याप्रसंगी प्रेमदास आकरे, अशोक हिंगणकर, विनोद भोले, वामन देशमुख, अशोक किरपान, सुभाष सरोदे, धनराज ढोबळे, मनोहर कोल्हे, अरविंद वाडीभस्मे, आकाश कापसे, रोहित चकोले, प्रशांत देशमुख, श्याम मस्के, राजहंस वंजारी, प्रविण आकरे, आनंद देशमुख, सेवक भोंदे, शैलेश हिंगे, जयश कापसे, गणेश सरोदे, अल्का कोल्हे, भावना पोटभरे, इंद्रपाल वंजारी, पतीराम देशमुख, कृष्णा सराडकर सह हनुमान मंदिर पंच कमेटी, बजरंगी प्रतिष्ठाण, परमात्मा एक सेवक मंडळ कार्यकर्ता आणि नागरिक उपस्थित होते.

कन्हान शहर सामाजिक कार्यकर्ता
श्री संत जगनाडे महाराज जयंती कन्हान शहर सामाजिक कार्यकर्ता व्दारे संताजी सभागृहातील मंदीरात कार्यक्रमा सह साजरी करण्यात आली.
श्री संताजी सभागृह कांद्री – कन्हान येथील मंदीरात कन्हान शहर सामाजिक कार्यकर्ता प्रवीण गोडे यांच्या हस्ते श्री संत जगनाडे महाराज, संत तुकाराम महाराज, विठ्ठल रूखमाई यांच्या प्रतिमे ला माल्यार्पण आणि दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ता रंजनिश ऊर्फ बाळा मेश्राम यांनी संत जगनाडे महाराज यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व सामाजिक कार्यकत्यानी श्री संत जगनाडे महाराज, संत तुकाराम महाराज , विठ्ठल रूखमाई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित कर विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन सामाजि क कार्यकर्ता सोनु मसराम यानी तर आभार हरीओम प्रकाश नारायण यानी व्यकत केले. याप्रसंगी युवा सामाजिक कार्यकर्ता ऋृषभ बावनकर, अभिजीत चांदुरकर, चंदन मेश्राम, सोनु खोब्रागड़े, स्वप्निल वाघधरे, सचिन यादव, संदीप देशमुख, सुनील लाडेकर, प्रकाश कुर्वे, मुकेश गंगराज, शाहरुख खान, अक्षय फुले, शुभम मंदुरकर, नितिन मेश्राम सह नागरिक उपस्थित होते.

कन्हान शहर युवा सामाजिक कार्यकर्ता
कन्हान – पिपरी शहर सामाजिक कार्यकर्ता व्दारे श्री संत संताजी जगनाडे महाराज, संत तुकाराम महाराज, विठ्ठल रुक्माई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण दीप प्रज्वलन, पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कन्हान – पिपरी सामाजिक कार्यकर्ता अमोल साकोरे, प्रशांत बाजीराव मसार हयानी संत जगनाडे महाराज यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित सर्वानी संत जगनाडे महाराज ,संत तुकाराम महाराज, विठ्ठल रुक्माई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमास अमोल साकोरे, प्रशांत मसार, प्रदीप नाटकर, गौरीशंकर आकरे, विक्की वाडीभस्मे, रामु कावळे, राजेश गजभिए, दिपक तिवाडे, नंदु येलमुले, संदीप भोयर सह कार्यकर्ता व नागरिक उपस्थित होते.