Published On : Mon, Dec 16th, 2019

कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या : कोतवालांची मागणी

नागपूर : गुजरात शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही कोतवालांना शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, अशी मागणी विदर्भ कोतवाल संघातर्फे करण्यात आली आहे. यासाठी संघातर्फे राज्य विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थात सोमवारी निदर्शने करण्यात आली.

राज्य शासनाने मुंबई राज्य अस्तित्वात असताना ७ मे, १९५९ ला सेवा प्रवेश नियम अस्तित्वात आणला आणि पगारी कोतवाल पद्धत लागू केली. परंतु वर्तमान परिस्थितीतही चतुर्थश्रेणीची मागणी शासनाकडे प्रलंबित आहे.

शासनाने कोतवालाला अद्यापही वेतनश्रेणी निश्चित केलेली नाही. नवनियुक्त महाविकास आघाडी शासनाने ही मागणी त्वरित पूर्ण करावी, अशी इच्छा निदर्शकांनी व्यक्त केली.