Published On : Fri, Sep 11th, 2020

रामटेक शहरात व ग्रामीण भागात ऐकून १६ रुग्णांची नव्याने भर

रामटेक: रामटेक तालुक्यात कोरोनाची वाढ झपाट्याने होत आहे . रामटेक शहरातिल जयप्रकाश वॉर्ड, भगतसिंग, टीलक, स्वामी विवेकानंद , शिवाजी, गांधी वार्ड, सह अंबाळा , अशे ऐकून शहरातील ११ कोरोणा रूग्णांची नव्याने भर झाली आहे तर ग्रामीण भागात मानापुर, पवणी, सह चीचाळा येथे ६ रूग्ण आढळले

ग्रामीण व शहर मिळून ऐकून १६ रूग्णांची नव्याने भर झाली असून आतापर्यंत ग्रामीण भागात १७६ तर शहरात १५९ असे ऐकून आकडा ३३५ पर्यंत पोहोचला आहे.

रामटेक शहर आणि ग्रामीण मिळून मृत्कांचा आकडा हा आता 10 वर येऊन पोहोचला आहे.

या सर्व रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची शोधा शोध घेणे सुरू आहे. अशी माहिती तालुका वैदकिय अधिकारी डॉ.चेतन नाईकवार यांनी दिली.
कोरोनाचा आकडा वाढतीवर असून बाहेर पडताना काही नागरिक मास्क लावत नाही आहेत, काही नागरिक सोशल डिस्टंसिंग चा सर्वत्र फज्जा करत आहे.

काही नागरिक अजूनही कोरोना बाबत जागृत नाही आहेत.

शहर व तालुक्यात कोरोना संसर्ग वाढल्या मागे प्रशासकीय यंत्रणेचा कमीपणा कारणीभूत तर नाही ना अशी चर्चा जागरूक नागरिकांमध्ये आहे.

रामटेक तालुक्यात कोरोणचा ब्लास्ट. प्रशासनाने कोरोना वर नियंत्रण कसे आणणार? असा यक्ष प्रश्न जागरूक नागरिक करीत आहे.