Published On : Wed, Jun 17th, 2020

16 किलो गांजा जप्त तीन आरोपीसह 2 लक्ष 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

कामठी:- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कळमना रोड वरील नगर परिषद स्व.चौधरी दयालसिंग यादव मराठी प्राथमिक शाळे समोर गांजा तस्करी होत असल्याची गुप्त माहिती नवीन कामठी पोलिसांना मिळताच पोलिसांनी यशस्वीरीत्या सापळा रचून सदर घटनास्थळ मार्गे दोन वाहनचालकाच्या ताब्यात असलेले पांढऱ्या रंगाचे प्लास्टिक बोऱ्याची झडती घेतली असता त्यात 16 किलो गांजा नावाचा अंमली पदार्थ आढळुन आला .पोलिसांनी त्वरित या 16 किलो गांजासह तीन आरोपिना ताब्यात घेतल्याची कारवाही काल सायंकाळी साडे पाच दरम्यान केली

असून या कारवाहितुन तीन आरोपीवर गुन्हा नोंदवीत अटक करण्यात आले तसेच 16 किलो गांजा किमती 1 लक्ष 60 हजार रुपये तसेच आरोपिकडे असलेले वेगवेगळ्या कंपनीचे चार मोबाईल, दुचाकी क्र एम एच 49 बी डी 5606 तसेच एम एच 49 ए झेड 7822 जप्त करण्यात आले असा एकूण 2 लक्ष 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . अटक आरोपी मध्ये सद्दाम शेख सुलेमान शेख वय 28 वर्षे, फरजान अहमद खान फिरोज खान वय 26 वर्षे दोन्ही राहणार भांनखेडा कब्रस्तान जवळ तहसिल नागपूर, तसेच परवेज मकसूद शेख शकील वय 20 वर्षे रा नंदनवन नागपूर असे आहे.

ही यशस्वी कारवाही डीसीपी निलोत्पल , एसीपी मुंडे यांच्या मार्गदर्शनार्थ , वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद धोंगडे, डी बी स्कॉड चे राजेश साखरे, सतीश मोहोड, निलेश यादव, श्रीकृष्ण दाभणे, ललित शेंडे यांनी यशस्वी केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी