Advertisement

नागपूर : पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून पीडितेची आरोपीसोबत ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. एप्रिल २०२६ मध्ये आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
काही दिवसांनंतर पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत ती सुमारे पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळाली आणि त्यांनी पाचपावली पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणात पोलिसांनी १९ वर्षीय श्रीधर ईश्वर राजकटटा याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.




