Advertisement
मुंबई: राज्यातील दारुविक्री सुरु असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये १४ मेपासून मद्याच्या होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, मुंबईसह दारुविक्री बंद असलेल्या ठिकाणी मद्याची होम डिलिव्हरी मिळणार नाही. उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या जिल्ह्यात दारुविक्री सुरु आहे तिथे रांगेत उभे राहण्यासोबत मद्य घरपोचही केले जाईल.
मद्याची होम डिलिव्हरी कशी द्यायची याचे नियोजन वाईन शॉप्सनी करायचे आहे. ही परवानगी केवळ कोरोना संपेपर्यंतच असेल. तसेच दारु घरपोच करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैदयकीय चाचणी करून त्यांची यादी उत्पादन शुल्क विभागाला द्यावी लागणार आहे. तसेच या कर्मचाऱ्यांनी हातमोजे, मास्क आणि गॉगल वापरणे बंधनकारक असेल.