Published On : Tue, Mar 3rd, 2020

दहाविच्या परीक्षेला सुरुवात रामटेक कस्टडी अंतर्गत १४ परीक्षा केंद्र

Advertisement

रामटेक : शालेय शिक्षणाचा अतिशय महत्वाचा टप्पा असलेल्या दहाविच्या परीक्षेला ३ मार्च पासुन रामटेक कास्टडीतील १४ परीक्षा केंद्रावर मराठीच्या पेपरने सुरुवात झाली. या परीक्षा केंद्रावर एकूण .३१४७ विद्यार्थी-विद्यार्थीनी परीक्षेला बसलेले आहेत.सकाळी साडेनऊ पासूनच परीक्षा केंद्रावर पालक मंडळी व विद्यार्थी-विद्यार्थीनींनी गर्दी केली होती. आयुष्यातील अतिशय महत्वपूर्ण टप्प्यावरील परीक्षेला सामोरे जातांना विद्यार्थी व पालकमंडळींमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. वर्ष भराचा प्रतिक्षे नंतर अखेर तो दिवस आलाच. विद्यार्थ्यांना वर्ष भर भीती असते, अभ्यास कस होणार, कसा रिझल्ट लागणार ,पास होऊ की नाही होऊ, हा तणाव विद्यार्थ्यांचा मनात असतो. वर्ष भराची मेहनत ३ तासा मध्ये सोडवणे म्हणजे डोक्यावर ओझेच वाटते.

या तीन तासामधे त्याचे भविष्य असते विद्यार्थ्यांना रोल नंबर्स बघण्याकरिता शालेतील शिक्षक, पार्यवेक्षक ,मुख्याध्यापक आदींनी सहकार्य केले .राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेकयेथील परीक्षा केंद्रावर मुख्याध्यापिका कमल लिखार,उपमुख्याध्यापक पुरुषोत्तम बेले व शिक्षकांनी रोल नंबर व वर्गखोल्या शोधण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनींना मदत केली. कस्टडी अंतर्गत सर्वच परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पडावी यासाठी परीक्षा विभागाचे परीरक्षक व गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने, सहाय्यक परीरक्षक प्रभाकर ठाकरे कार्यरत आहेत.पहिल्या पेपरची सुरुवात शांततेत पार पडली असून कुठेही गैरप्रकार झाला नसल्याची महिती गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने यांनी दिली.

आपला मुलगा, मुलगी परीक्षे मधे चांगल्या गुणांनी पास व्हावे म्हणून सगळे पालक आणि शिक्षकही वर्ष भर खूप मेहनत घेतात… अभ्यास केलं आहे तर निश्चितच सगळे विद्यार्थी पेपर्स चांगलेच सोडविणार. दहावी म्हणजे भविष्याचा टर्निंग पॉईंट. विद्यार्थ्यांची पहिली बोर्ड परीक्षा असल्यामुळे ऑल द बेस्ट म्हणून शिक्षक ,पालक, मित्रमंडळी सह नातेवाईकांनी सुद्धा परीक्षेच्या शुभेच्छा दिलया