Published On : Tue, Mar 3rd, 2020

सत्रापुर कन्हान येथे भव्य आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शिबीराचा १९५ लाभार्थ्यानी लाभ घेतला.

कन्हान : – तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी व सिटी हॉस्पिटल रनाळा काम ठी व्दारे सत्रापुर कन्हान येथे भव्य आरोग्य तपासणी शिबीरांचा परिसराती ल १९५ लाभार्थ्यानी लाभ घेतला.

सोमवार ०२ मे २०२० ला सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत भव्य आरोग्य तपास णी शिबीरांचे आयोजन करण्यात आले. सीटी हॉस्पिटल चे डॉ तंजिम आजमी, डॉ रुहेना आजमी, आर्थोपेडिक डॉ रेहान आजमी, फिजिसियन डॉ आमना सिद्धिकी, डॉ उनेजा आजमी यांच्या चमुनी १९५ महिला, पुरुष व मुलांची आरोग्य तपासणी केली. यात बी पी, शुगर, सर्दी, खोकला, तापाच्या मोफत औषधी देण्यात आल्या.


मोठया आजारा च्या उपचारात ५०% सुट देण्याची घोष णा डॉ तंजिम आजमी हयानी केली. तेजस संस्थाचे अध्यक्ष चंद्रशेखर अरगुले वार व उपाध्यक्ष देवीदास पेटारे हयानी डॉ तंजिम आजमी हयाच्या सहकार्याने जिल्हयातील छोटया छोटया गावातील गोरगरिब लोकांची सेवा करण्याची मनशा व्यकत केली. शिबीरास विदर्भ राज्य आंदोलन समितिचे मुख्य सयोजक श्री राम नेवले, विदर्भवादी श्री अरुण केदार, श्री सुनील चोखारे आदीने भेट दिली.

शिबीराच्या यशस्विते करिता संस्थाचे सदस्य देवानंद पेटारे, राजन भिसे,अर्जुन पात्रे, देवानंद खड़से,अशोक खड़से,ज्वाला खड़से, रामु खड़से, सोहन पात्रे, शेलेन्द्र पात्रे, देवचंद पात्रे, अभय पेटारे, विनोद लोंढे, अजय भिसे, नाना पेटारे, कुमार बाबा,अशोक पात्रे, रितेश भिसे, दीपचंद शेंडे, मार्गदर्शक विनोद कास्त्री आदीने अथक परिश्रम घेतले.