Published On : Tue, Mar 3rd, 2020

भरधाव ट्रक च्या धडकेत शालेय विद्यार्थीनी ठार

गेल्या अनेक कालावधीपासून शाळेसमोर भूमिगत मार्गाची मागणी आहे. रस्त्यावर अपघात ही नित्याचीच बाब असून शाळेत विद्यार्थी येतांना अपघाताला घाबरतात त्यामुळे शालेय उपस्थिती कमी असते लवकरात लवकर भूमिगत मार्गाचा प्रश्न निकाली काढावा असे मत स्थानिक नागरिक यानी व्यक्त केले रामटेक . नागपुर -जबलपूर राष्र्टीय महामार्गावरील कांद्री (खदान)येथील जिल्हा परिषद शाळेसमोर झालेल्या अपघातात शाळेला येत असलेल्या चिमुकली विद्यार्थीनीचा जागेवरच मृत्यु झाल्याने परिसरात शोककळा पसरली.

सिया रामचित्र कुछवाह (७वर्ष)असे मृत विद्यार्थीनीचे नाव असून ती जिल्हा परिषद कांद्री शाळेची इयत्ता १लीची विद्यार्थीनी होती.अत्यंत हुशार व चुणचुणीत असलेली ही चिमुकली शाळेतील शिक्षक व सहविद्यार्थ्यांच्या लाडाची होती. नित्य नेमाप्रमाणे शाळेत येत असता विरुद्ध दिशेने राख घेवून वीटभट्यावर जात असलेल्या ट्रक क्रमांक एम एच -३१/सी बी ९२६९ वाहनाने विद्यार्थीनीला जोरात धडक दिल्याने विद्यिर्थीनीचा जागेवरच मृत्यु झाला. अपघातामुळे गावकरी संतप्त झाले व दोन तास रस्ता रोको आंदोलन केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी पोलीस ताफ्यासह दाखल होऊन जमावाला शांत केले. यावेळी देवलापारचे ठाणेदार प्रवीण बोरकुटे अरोलीचे ठाणेदार विवेक सोनवणे उपस्थित होते रामटेक पोलिसांनी भादवि कलम 279 304 अ आर डब्ल्यू 184 अनवये गुन्हा दाखल केला आहे .या गावात रस्त्याचे बांधकाम सुरू असतांना भूमिगत मार्गाची मागणी बरेच दिवसापासून करत आहेत पण काम प्रलंबित असल्याने मार्गावर छोटे मोठे अपघात होतच असतात. आजच्या घटनेने वातावरण तणावाचे होते.


घटनास्थळाला माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे,पंस.सभापती कला ठाकरे, सरपंच परमानंद शेंडे, माजी जिपी सदस्य मोहन यादव उपसरपंच मंजीत बहेलिया ,मोहन यादव ,गज्जु यादव ,गटशिक्षणाधिकारी संगीता तभाने.शाळा समितीचे अध्यक्ष श्रावण ताकोद, मुख्याध्यापक प्रशांत जांभुळकर यांनी भेट देवून परिस्थिती सांभाळून वाहनांचे आवागमन सुरू केले. तीन बहिणी व एक भाऊ असून आई वडील हात मजुरी करतात.मृतकाच्या परिवाराला राजीव गांधी रस्ता अपघात विमा योजने अंतर्गत अनुदान मिळण्यात यावे अशी मागणी करण्यांत आली.विद्यार्थीनीचा अपघाती मृत्यु झाल्याने कांद्री परिसरित हळहळ व्यक्त होत आहे.सायंकाळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.