नागपूर : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC Result) जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला असून नागपूर विभागाचा 92.05 टक्के निकाल लागला आहे.
यातच नागपूरच्या पंडित बच्छराज व्यास विद्यालयातील स्वरांश तामगडे ९८.४० टक्के गुण मिळवत अव्वल ठरला आहे. तर सोमलवार शाळेतून आदित्य गुलटे याला दहावीत ९७.८ टक्के गुण मिळाले आहे. तर आरांश सरपटवर यानेही ९६.६ टक्के मिळावीत चांगली कामगिरी केली.
दिव्यांग विद्यार्थींनीही केली उत्तीर्ण कामगिरी –
शंकर नगर येथील मुक बधिर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण कामगिरी केली आहे. निखिल संतोष शेंडगे ७४.६० टक्के , स्वराजदीप सदरसिंग धुर्वे
७३.८० टक्के, दिगंबर जनार्दन माळोदे ७२.२० टक्के मिळविले आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत पार पडली. यंदा दहावीच्या परीक्षेला 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 79 हजार 374 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.